घरCORONA UPDATECoronavirus : डोक्यातील उवा मारण्याच्या औषधाने कोरोना विषाणूचा नायनाट; संशोधकांचा दावा

Coronavirus : डोक्यातील उवा मारण्याच्या औषधाने कोरोना विषाणूचा नायनाट; संशोधकांचा दावा

Subscribe

मानवी डोक्यात असणाऱ्या उवा मारण्याच्या औषधातून ४८ तासात कोरोना व्हायरसचा नायनाट केला जाऊ शकतो, असे संशोधन समोर आले आहे.

कोरोना विषाणू सोबत लढण्यासाठी संपूर्ण जग उभे राहिले आहे. भारतासह इतर देशांमध्ये कोरोनावर औषधोपचार शोधण्यासाठी विविध प्रयोग सुरू आहेत. यावेळी, ऑस्ट्रेलियामधून मोठी बातमी समोर आली आहे. संशोधनानुसार, मानवी डोक्यात असणाऱ्या उवा मारण्याच्या औषधातून ४८ तासात कोरोना व्हायरसचा नायनाट केला जाऊ शकतो, असे संशोधन समोर आले आहे.

‘द सन’ यांनी प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, मोनाश बायोमेडिसिन डिस्कवरी इन्स्टिट्यूटचे डॉ. कायली वागस्टाफ यांनी सांगितले की, उवा मारण्यासाठी Ivermectin (इवरमेक्टिन) या औषधाचा उपयोग केला जातो. या औषधांच्या एका डोसने कोरोना व्हायरस नष्ट होतो. औषध घेतल्यानंतर २४ तासांमध्ये विषाणूंचा परिमाण नष्ट होण्यास सुरुवात होते. आणि ४८ तासात कोरोना संपूर्णपणे समाप्त होतो. अँटीवायरल रिसर्च पत्रामध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे.

- Advertisement -

मोनाश बायोमेडिसिन डिस्कवरी इन्स्टिट्यूट हे मेलबर्न स्थित मोनाश यूनिवर्सिटीचा एक भाग आहे. डॉ. कायली वागस्टाफच्या म्हणण्यानुसार, कोरोना व्हायरसवर सध्या तरी कोणतेही औषध उपलब्ध नाही आहे. यावेळी नवीन औषध शोधण्याऐवजी उपलब्ध औषधांचे मिश्रण बनवून उपयोग केला तर नागरिकांना याचा फायदा होईल. जोपर्यंत कोरोनावर वैक्सिन निघत नाही, तोपर्यंत अशा प्रकारे उपचार केला जाऊ शकतो. अँटी-पैरासाइटिक औषधे परजीवी पासून होणाऱ्या आजारांवरील उपचारासाठी तयार केली जातात. परजीवी रोधक औषध एचआयव्ही, डेंग्यू, इंफ्लुएंजा आणि जीका व्हायरस विरोधात प्रभावी ठरले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -