घरक्राइमदेवेन भारती यांची मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती

देवेन भारती यांची मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती

Subscribe

देवेन भारती हे 1994 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. जेव्हा राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, तेव्हा ते सर्वात पॉवरफूल अधिकारी असल्याचं सांगितलं जात आहे

मुंबईः आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. देवेन भारती यांची नेमणूक झालेले विशेष पोलीस आयुक्त हे पद नव्याने निर्मित करण्यात आलं आहे. देवेन भारती हे फडणवीस यांच्या जवळचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच त्यांच्याकडे मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तपदाचा पदभार सोपवल्याचं बोललं जातंय.

देवेन भारती हे 1994 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. जेव्हा राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, तेव्हा ते सर्वात पॉवरफूल अधिकारी असल्याचं सांगितलं जात आहे. देवेन भारती हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मुंबई पोलीस दलात सहआयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) आणि एटीएस प्रमुखपदी अशा महत्त्वाच्याच पदांवर कार्यरत होते. परंतु ठाकरे सरकारमध्येही 3 सप्टेंबर 2020 ला देवेन भारती यांची एटीएसच्या प्रमुखपदावरून बदली करण्यात आली होती. मात्र, त्यांना नवीन पोस्टिंग न दिल्याने ते त्याच पदावरती 9 ऑक्टोबरपर्यंत सव्वा महिने कार्यरत होते. अखेर सव्वा महिन्यांनंतर त्यांची अप्पर पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळावर नियुक्ती करण्यात आली.

- Advertisement -

विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारनं आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्याही केल्या होत्या. मुंबई पोलीस आयुक्त अखत्यारीतील पाचही सहपोलीस आयुक्तांच्या बदल्या करीत तेथे नवीन अधिकार्‍यांना नेमण्यात आले होते. या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांचा गृहखात्यावर एकहाती कंट्रोल असल्याचे दाखवून दिले होते. मागील काही दिवसांमध्ये सातत्याने बदल्या करीत फडणवीस यांनी पोलीस दलात भाकरी फिरवली होती. मुंबई पोलीस दलात 5 आयपीएस अधिकार्‍यांच्या नियुक्त्या महत्त्वाच्या मानल्या जात होत्या.

मुंबईचे कायदा आणि सुव्यवस्था शाखेचे सहपोलीस आयुक्त म्हणून आयपीएस अधिकारी सत्यनारायण चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच आयपीएस अधिकारी निशिथ मिश्रा यांना आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहपोलीस आयुक्त करण्यात आली होती. प्रशासन विभागात सहपोलीस आयुक्त एस. जयकुमार यांची वर्णी लावण्यात आली असून वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त म्हणून प्रवीण पडवळ यांची निवड केली होती. तसेच आयपीएस अधिकारी लखमी गौतम यांच्याकडे गुन्हे शाखेच्या सहपोलीस आयुक्तपदाचा पदभार सोपवण्यात आला होता. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मर्जीतील पाचही आयपीएस अधिकार्‍यांना मुंबईच्या महत्त्वाच्या विभागात नियुक्ती देऊन पोलीस दलावर आपला अंकुश कायम ठेवला होता. आता देवेन भारती यांच्यासाठी नवीन पदाची निर्मिती करून देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील पूर्ण पोलीस दल आणि गृह खात्यावर एकहाती कंट्रोल मिळवला आहे.

- Advertisement -

हेही वाचाः फडणवीसांचा गृहखात्यावर एकहाती कंट्रोल बदलले मुंबईतील पाचही सहपोलीस आयुक्त

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -