घर ताज्या घडामोडी लोकसभा निवडणूक २०२४ साठी भाजपाचे 'मिशन ४५'; सर्व जागा जिंकायच्याच, फडणवीसांचे कार्यकर्त्यांना...

लोकसभा निवडणूक २०२४ साठी भाजपाचे ‘मिशन ४५’; सर्व जागा जिंकायच्याच, फडणवीसांचे कार्यकर्त्यांना आदेश

Subscribe

भाजपने लोकसभा निवडणूक २०२४ साठी 'मिशन ४५' (Mission 45) आखले आहे. शिवाय लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचे सगळे काही प्लॅनिंग ठरले आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले.

राज्यात येत्या आगामी काळात अनेक निवडणुका (Elections) होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व पक्षाचे नेतेमंडळी निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. आगामी काळातील महापालिका निवडणूकही (BMC Elections 2022) होणार असून यासाठी भाजपा (BJP) आणि शिवसेना (Shiv Sena) या दोन पक्षांनी कंबर कसली आहे. मात्र महापालिका निवडणुकीनंतर २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक होणार आहेत, आणि या निवडणुकासाठी भाजपाने आतापासूनच तयारीला सुरूवात केली आहे. भाजपने लोकसभा निवडणूक २०२४ साठी ‘मिशन ४५’ (Mission 45) आखले आहे. शिवाय लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचे सगळे काही प्लॅनिंग ठरले आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले. (devendra fadanvis bjp mission 45 plan for loksabha election 2024)

देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना लोकसभा निवडणूक २०२४ (Loksabha Election 2022) साठी भाजपाचे प्लॅनिंग ठरल्याचे सांगितले. यावेळी ते म्हणाले की, “ज्या जागा आम्ही जिंकलो आहोत, त्याच्यावर तर आमचं लक्ष आहेच. पण आम्हाला ज्या जागा जिंकायच्या आहेत, त्यावर आम्ही अधिक लक्ष केंद्रीत करतोय. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने १६ मतदारसंघ निवडले आहेत. याव्यतिरिक्त ८ मतदारसंघावर देखील लक्ष ठेवत आहोत. राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी भाजपच्या ४५ जागा निवडून आणण्यासाठी आतापासून तयारी सुरु केली आहे”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची धुरा आशिष शेलार यांच्या खांद्यावर

राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या ताब्यातील जागा हिसकावून घेण्यासंबंधीचे प्लॅनिंग आजच्या बैठकीत झाले. तसेच, बारामती, मावळ, सोलापूर, कोल्हापूर, सातारा मतदारसंघात जोर लावण्याच्या सूचनाही यावेळी फडणवीसांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान, लोकसभा निवडणूक २०२४ साठीच्या तयारी आणि रणनिती ठरविण्यासाठी आज राज्य भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष विनोद तावडे उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा – एमआयएमचं एक मत महाविकास आघाडीला, उद्या मुंबईतील बैठकीनंतर होणार अंतिम निर्णय

या बैठकीनंतर फडणवीस म्हणाले की, “महाराष्ट्रातल्या जागांसाठी आम्ही एक कमिटी गठित केली आहे. ही कमिटी चंद्रशेखर बावनकुळे कोऑर्डिनेट करत आहेत. आमचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे आज बैठकीसाठी आले होते. पुढच्या १८ महिन्यांचे प्लॅनिंग ठरले. स्टॅस्ट्रेजी ठरली आहे. प्रभारींचा काय रोल असणार आहेत, त्यांचे काम आहे, कधी दौरे करायचे, कुठे दौरे करायचे, याची माहिती दिली.”

पुढील २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी आतापासून सुरु करत आहोत. भारतीय जनता पार्टीचा हा कामाचा भाग असून, केवळ निवडणुकीच्या काळात तयारी करायची असे नाही. सातत्याने तयारी केली पाहिजे, लोकांच्यामध्येही गेले पाहिजे. लोकांपर्यंत योजना पोहोचतात की नाही?, लोकांना लाभ मिळतोय की नाही?, याचा आढावा घेतला पाहिजे, यांसारख्या अनेक कारणांकरीता भाजपाने हे मिशन आखले असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अजितदादांच्या विरोधात षडयंत्र
देहूतला कार्यक्रम अतिशय चांगला पार पडला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमात उपमुमख्यमंत्री अजित पवार यांच्याशी अतिशय सौहार्दपूर्ण वर्तन ठेवले.अजितदादांचे नाव भाषणासाठी घेतले नाही, तेव्हा स्वतः  पंतप्रधानच बोलले की अजितदादा बोला.मात्र हे कोणाला तरी पाहवत नाही.याला जाणीवपूर्वक गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जात आहे.हे अजितदादांच्या विरोधातीलच षडयंत्र असल्याचा दावा करताना फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधये छुपा सत्तासंघर्ष असल्याचे सूचित केले. दरम्यान,राष्ट्रपतिपदाच्या  निवडणुकीत एनडीएचा उमेदवार सहज जिंकून येईल हे स्पष्ट आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तब्येतीचे कारण देत निर्णय जाहीर केला आहे.त्यांनी विचार करूनच हा निर्णय घेतला असेल.त्या निर्णयाचा आदर केला पाहिजे, असेही फडणवीस  यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.


“राज्यातील ४८ लोकसभा  मतदारसंघात आम्ही ताकदीने लढू.  या अगोदर आम्ही  ४२ मतदारसंघ जिंकले आहेत. ४२ मतदारसंघ जिंकणे  हे काही सोपे  काम नाही, ते आम्ही जिंकलेलो आहोत. त्यामुळे मला विश्वास आहे की ४८ मतदारसंघात आमची तयारी असणार आहे आणि आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू”
– देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा


हेही वाचा – महापालिकेचा निकाल राज्यसभेप्रमाणेच लागणार; मुंबईची कन्या म्हणून नवनीत राणा भाजपचा प्रचार करणार

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -