मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. त्यातच काल (मंगळवारी) भाजपाने महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. पुण्यातील माजी पोलीस अधिकारी रवींद्र पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निवडणुकीत परकीय चलन वापरल्याचा तसेच अनेक आर्थिक व्यवहारांसाठी बिटकॉइनचा वापर केल्याचा आरोप केला आहे. त्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Devendra fadanvis On Bitcoin.)
हेही वाचा : Maharashtra Election 2024 : सिंधुदुर्गातील तीन मतदारसंघांत 17 उमेदवार; 6,78,928 मतदारांचा कौल महत्त्वाचा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी नागपुरात मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यावेळी त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस देखील सोबत होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. ते म्हणाले, माझं स्प्ष्ट मत आहे की या संदर्भामध्ये योग्य ती चौकशी झाली पाहिजे. पुण्यातील माजी पोलीस अधिकारी रवींद्र पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निवडणुकीत परकीय चलन वापरल्याचा व अनेक आर्थिक व्यवहारांसाठी बिटकॉइनचा वापर केल्याचा आरोप केलाय, त्या संदर्भात फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा : Maharashtra Assembly 2024 : निवडणुकीसाठी आज मतसंग्राम; दिग्गज नेत्यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला
भाजपा खासदार आणि प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी मंगळवारी रात्री पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हे आरोप केल्याचे दिसून आले आहे. यावेळी त्यांनी यासंबंधीचे कथित पुरावे म्हणून काही कॉल रेकॉर्डिंग्स आणि व्हॉट्सअॅप चॅट्सचे स्क्रीनशॉट सादर केले आहेत. भाजपाच्या या आरोपांनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर प्रतिक्रिया देताना सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच त्रिवेदी यांच्याविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे खासदार सुळे यांनी म्हटले आहे. खोटी माहिती पसरवणाऱ्या पुण्याचे माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील आणि गौरव मेहता यांच्या विरोधात सायबर फसवणुकीची तक्रार तात्काळ दाखल करण्यात यावी, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे.
Edited By Komal Pawar Govalkar