Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रDCM Devendra Fadanvis : लाडकी बहीण योजनेचा प्रभाव किती? फडणवीसांनी स्पष्टच सांगितले

DCM Devendra Fadanvis : लाडकी बहीण योजनेचा प्रभाव किती? फडणवीसांनी स्पष्टच सांगितले

Subscribe

यंदा निवडणुकीमध्ये महिलांच्या मतदानाची टक्केवारी वाढल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच हा प्रभाव लाडकी बहीण योजनेचा असू शकतो, असे देखील यावेळी त्यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबई : बुधवारी राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडले आहे. आता राज्यातील प्रत्येक नागरिकांचे लक्ष फक्त 23 नोव्हेंबरला काय घडणार? राज्यात नक्की कोणाची सत्ता येणार याच्याकडे आहे. त्यातच आज सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रभाव यावेळी मतदानावर पडल्याचे त्यांनी म्हटले आहे. कारण यंदा निवडणुकीमध्ये महिलांच्या मतदानाची टक्केवारी वाढल्याचे त्यांनी स्पष्टच सांगितले आहे. तसेच हा प्रभाव लाडकी बहीण योजनेचा असू शकतो, असेही ते यावेळी ते म्हणाले आहेत.(Devendra Fadanvis Reaction Ladki Bahin Yojna Effect on Election.)

हेही वाचा : Congress : अदानींवर आरोप होताच काँग्रेसने व्हिडीओ शेअर करत मोदींवर साधला निशाणा

- Advertisement -

आम्ही प्रत्येक बुथचे प्रमाणपत्र बघितले आहे. तसेच मी स्वत: 25 ते 30 मतदारसंघात संबंधित लोकांशी बोललो, त्यावरून कळाले की यंदा मतदानामध्ये महिलांची संख्या जास्त आहे. अशी प्राथमिक माहिती त्यांनी दिल्याचे फडणवीस म्हणाले आहेत. आम्ही अद्याप अपक्षांशी संपर्क साधला नाही, असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. तसेच राहुल गांधींनी आरोप केले आहेत की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्योजक अदानींना वाचवत आहेत, यावर फडणवीस म्हणाले, राहुल गांधी नेहमी बोलत असतात त्यामध्ये कोणती नवीन गोष्ट आहे. तसेच एक्झिट पोलवर प्रवक्ते बोलतात नेते बोलत नाही असेही त्यांनी माध्यमांना सांगितले आहे.

हेही वाचा : Pune News : पुण्यात शरद पवारांच्या ‘NCP’च्या उमेदवारांचे आमदार म्हणून झळकले बॅनर्स, कार्यकर्त्यांसोबत डान्सही; पण 2019 मध्ये…

- Advertisement -

लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या मतदानाची टक्केवारी वाढली असेल असे त्यांनी मत व्यक्त केले आहे. तसेच 23 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसू आणि योग्य तो निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले आहे. काल पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर राज्यातील मतदानाची टक्केवारी वाढली यावर फडणवीसांनी मत व्यक्त केले. ते म्हणाले, राज्यातील सत्ताधारी पक्षावर लोकांचा असलेला विश्वास आहे म्हणून लोकांनी जास्तीत जास्त मतदान करून आपले कर्तव्य बजावले आहे.


Edited By Komal Pawar Govalkar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -