शिक्षकांचा खरा प्रतिनिधी विधान परिषदेत जावा म्हणून किरण पाटलांची निवड; फडणवीसांचं प्रतिपादन

devendra fadanvis reaction marathwada aurangabad teachers constituency election 2023

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 30 जानेवारीला मतदान होणार असून 2 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आसल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. मराठवाड शिक्षक मतदारसंघाच्या दोन निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे यांनी भाजपचा पराभव केला आहे. यंदाही विक्रम काळे यांची लढत काँग्रेसमधून भाजपत आलेल्या किरण पाटील यांच्याशी होईल. दरम्यान किरण पाटील यांच्या उमेदवारीवर आत राज्याचे उपमुख्यमंत्री, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. शिक्षकांचा खरा प्रतिनिधी विधानपरिषदेत जावा म्हणून किरण पाटलांची निवड केल्याचं म्हणत फडणवीसांनी त्यांच्याबाबत कौतुकोद्गार काढले आहेत. फडणवीस आज औरंगाबादमध्ये बोलत होते.

फडणवीस म्हणाले की, भाजप, बाळासाहेबांची शिवसेना, रिपाइं यासोबत वेगवेगळ्या शैक्षणिक संघटनांचा पाठिंबा घेऊन प्राध्यापक किरण पाटील मैदानात उतरले आहेत. ते स्वत: एक शिक्षक असल्यामुळे शिक्षकांच्या अडचणी काय आहेत, शिक्षकांना काय हवं आहे, याची जाण त्यांना आहे.

किरण पाटील यांनी चळवळीचा एक मोठा काळ बघितल्याने आवश्यकता असल्यास संघर्ष करण्याची त्यांची मानसिकता असेल, म्हणून शिक्षकांचा एक खरा प्रतिनिधी हा विधानपरिषदेमध्ये जावा या दृष्टीने आम्ही त्यांची निवड केली. त्यामुळे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने ते याठिकणी पोहचलीतचं आणि आपल्या आशा, आकांशा पूर्ण करण्याचं काम करतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.


BBC Documentary Row : जेएनयू वादावर अद्याप कोणताही FIR दाखल नाही