Monday, February 15, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी शरद पवारांवर असभ्य टीका, फडणवीसांनी पडळकरांना बोलावून घेतले

शरद पवारांवर असभ्य टीका, फडणवीसांनी पडळकरांना बोलावून घेतले

Related Story

- Advertisement -

जेजुरी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमाच्या अगोदरच जेजुरी संस्थान आणि भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर यांच्यातला वाद समोर आला होता. या प्रकरणात पोलिसांनाही हस्तक्षेप करावा लागला होता. नियोजित अशा कार्यक्रमाआधीच पडळकर यांनी जेजुरीत पोहचत उद्घाटन केल्याचे जाहीर केले. त्यावेळी पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर असभ्य भाषेत टीकाही केली होती. तसेच पुतळ्याचे अनावरण करण्याचा अधिकार या भ्रष्ट नेत्याला नाही अशा शब्दात टीकादेखील केली होती. अहिल्यादेवी आणि शरद पवार यांच्या विचारात साम्य नसल्याची टीकाही पडळकरांनी केली होती. पण शरद पवारांवर केलेली टीकेवर भाजपने त्यांची पाठराखण केली आहे. खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पडळकरांच्या विधानावर कोणताही आक्षेप घेण्यासारखे ते वक्तव्य नसल्याचे सांगत त्यांना क्लिन चिट केली आहे. पण राज्याचे विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी मात्र पडळकरांच्या भाषेविषयी आधीच भूमिका मांडलेली आहे. (Devendra fadanvis slams goipchand padalkar on remarks over NCP chief sharad pawar)

शरद पवारांना लक्ष्य करताना गोपिचंद पडळकर यांची भाषा म्हणजे ती धनगर समाजाची भाषा आहे. हा समाज शरद पवारांवर चिडलेला आहे, त्या समाजाची भाषाच तशी आहे अशी पाठराखण चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. पण या सर्व प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी आधीच्या प्रसंगानंतर एक वेगळीच भूमिका घेतली होती. शरद पवारांवर गोपिचंद पडळकर यांनी टीका केल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी याआधीच्या घटनेत व्यक्त केली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे सोलापूरात एका दौऱ्यानिमित्ताने आले होते. या दौऱ्यातच फडणवीस यांनी पडळकरांना बोलावून घेतले. त्यावेळी पडळकर यांचा फडणवीसांनी चांगलाच समाचार घेतला होता.

फडणवीसांनी पडळकरांना का झापलं ?

- Advertisement -

भाजपच्या गोटात आधीच गोपिचंद पडळकरांना विधानपरिषेदची आमदारकी दिल्याने नाराजी होती. त्यातच शरद पवारांवर टीका केल्याने देवेंद्र फडणवीसांची नाराजी गोपिचंद पडळकरांनी ओढावून घेतली होती. सोलापूरच्या दौऱ्यात फडणवीसांनी पडळकरांना बोलावून घेतले होते. त्यानंतर फडणवीस पडळकरांना म्हणाले की, महाराष्ट्राची एक संस्कृती आहे. शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्याबद्दल आपण या पातळीवर जाऊन बोलायला नको, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी पडळकरांनी कानउघडणी केली होती. पण जेजुरीतील घटनेनंतर मात्र पडळकरांची भाषा सुधारते आहे असे प्रमाणपत्र आता खुद्द प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच दिले आहे. पडळकरांनी पवारांवर बोलताना आपल्या भाषेत सुधार आणला आहे. शरद पवारांकडून होणारी फसवणूक ही धनगर समाजाने सहन केली आहे. त्यामुळेच या समाजात पवारांविरोधात चीड आहे. या समाजातील लोक अशाच पद्धतीने बोलतात असेही पाटील म्हणाले. त्यांची एक भाषा आहे असे ते म्हणाले. तर दुसरीकडे शरद पवारही अतिशय टोचून बोलतात अशा शब्दात शरद पवारांवर चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला आहे.


हे ही वाचा – दुसऱ्या दिवशी भारतीय संघ २४९ धावांनी आघाडीवर, आर.अश्विनची सर्वोत्कृष्ट गोलंदाजी


- Advertisement -

 

- Advertisement -