Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रDevendra Fadanvis : ते पुन्हा आले; विदर्भात भाजपचे वर्चस्व अन् फडणवीसांचा विजय

Devendra Fadanvis : ते पुन्हा आले; विदर्भात भाजपचे वर्चस्व अन् फडणवीसांचा विजय

Subscribe

नागपूर : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शनिवारी (23 नोव्हेंबर) दुपारपर्यंत अखेर चित्र स्पष्ट झाले असून महायुतीला सर्वाधिक जागांवर आघाडी मिळाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात एकहाती विजय मिळवला आहे. त्यांच्या विजयासोबतच भाजपसह महायुतीने विदर्भात वर्चस्व प्रस्थापित केले आहे. कारण, दुपारपर्यंत विदर्भाच्या 62 जागांपैकी 53 जागांवर आघाडी महायुतीने मिळवली होती. तर, महाविकास आघाडीकडून काँग्रेस 7 जागांवर आघाडीवर होते. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शरद पवार गट यंदाचा सुपडा साफ झाल्याचे चित्र समोर आले होते. (Devendra Fadanvis won in Maharashtra Election Result 2024)

हेही वाचा : Balasaheb Thorat : काँग्रेसचा ‘CM’पदाचा चेहरा पडला, शिंदेंच्या उमेदवारानं थोरातांचा पराभव करत ठरला ‘जायंट किलर’  

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस हे सहाव्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. मतमोजणीत पहिल्या फेरीपासूनच ते आघाडीवर होते. त्यांच्याविरोधात काँग्रेसने प्रफुल्ल गुडधे यांना उमेदवारी दिली होती. पण देवेंद्र फडणवीस यांनी याही विधानसभेत सहज विजय मिळवला. अठराव्या फेरी अखेर त्यांच्याकडे 24,230 मतांची आघाडी होती. दरम्यान, त्यांना शुभेच्छा देताना त्यांच्या मातोश्रींनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री झाल्याचे पाहायचे असल्याचे मत व्यक्त केले. फडणवीस यांचा विजय निश्चित होताच आता भाजपचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचे नाव पुढे येत आहे.

लोकसभेत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपला विजय तर मिळाला होता, पण कमी जागा आल्याने ते राज्यातील राजकारणातून बाहेर पडत असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. त्यानंतर या नाराजीनाट्यानंतर वरिष्ठांनी त्यांची समजूत काढली होती. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून राज्याचा कार्यभार सुरू ठेवला. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विधानसभा लढणाऱ्या भाजप महायुतीने महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला आहे.


Edited by Abhijeet Jadhav

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -