घरताज्या घडामोडीसंभाजीराजेंची कोंडी करण्याचा प्रयत्न, देवेंद्र फडणवीसांचा मविआवर आरोप

संभाजीराजेंची कोंडी करण्याचा प्रयत्न, देवेंद्र फडणवीसांचा मविआवर आरोप

Subscribe

युवराज संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरुन त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न झालेला आहे. याची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad Pawar) यांच्यापासून सुरुवात करण्यात आली असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. शरद पवारांनी ज्या प्रकारे पहिल्यांदा विषय सुरु केला यानंतर ज्या दिशेने गेल्या त्यामुळेच याला वेगळं वळण लागले आहे. यावरुन त्यांचा कोंडी करण्याचा प्रयत्न झाला असल्याचे मला वाटत आहे. असे फडणवीसांनी म्हटलं आहे.

संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेना पुरस्कृत उमेदवारी देण्यापासून शिवसेनेकडून विरोध करण्यात आला आहे. शिवसेनेत आल्यास खासदारकीसाठी उमेदवारीची घोषणा करण्यात येईल असं शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे. परंतु संभाजीराजेंचा शिवसेनेत जाण्यास नकार आहे. यामुळे शिवसेनेने कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राजेंची कोंडी करण्यात आली आहे. तसेच देवेंद्र फडणवीसांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आरोप केला आहे.

- Advertisement -

मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील म्हणाले की, संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी वेगळी रणनिती आखली पाहिजे होती. यावेळी तुम्हाला महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळेल असे कोणी सांगितले होते. हा मध्यस्थ कोण होता. त्यांच्यामध्ये काय बोलणं झाले होते हे सगळं संभाजीराजेंनी जाहीर करावे, कोणी फसवणूक केली हे संभाजीराजेंनी सांगावे असेही विनोद पाटील यांनी म्हटलं आहे.

संभाजीराजेंना पाठिंबा देण्याचे अधिकार फडणवीसांकडे?

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत वरिष्ठ नेत्यांसोबत एक बैठक पार पडली. या बैठकीत राज्यसभा निवडणुकीच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली आहे. राज्यात दोन राज्यसभेच्या जागा या भाजपकडे आहेत. तसेच संभाजीराजे छत्रपती यांना पाठिंबा देण्याचे अधिकार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच भाजपने तिसऱ्या जागेसाठी निवडणूक लढवण्याबाबत अद्याप निर्णय घेतला नाही. परंतु संभाजीराजेंनी या जागेवर आपला दावा केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : ओबीसी आरक्षणासाठी भाजपचा मंत्रालयावर मोर्चा, प्रवीण दरेकर, मुनगंटीवार पोलिसांच्या ताब्यात

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -