घरमहाराष्ट्रबुलेट ट्रेनच्या कामात राजकारण

बुलेट ट्रेनच्या कामात राजकारण

Subscribe

देवेंद्र फडणवीस यांची अशोक चव्हाणांना मध्यस्तीची विनंती

मुंबई-अहमदाबाद या बुलेट ट्रेनच्या कामात महाराष्ट्रात राजकारण आणले जात आहे. त्यामुळेच आपल्याकडे हे काम रखडले आहे. त्यामुळे मुंबईतील बुलेट ट्रेनचे काम थांबवू नका,हे तुम्ही मुख्यमंत्र्यांना समजावा, असे म्हणत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुलेट ट्रेनच्या कामात मध्यस्ती करण्याची विनंती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली.

दिवंगत गंगाधरराव देशमुख यांच्या स्मृतिग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी राज्यातील राजकीय युद्ध गँग वार होऊ नये, राजकारणाचा स्तर घसरलाय, तो राखल्यास महाराष्ट्र हिताचे काम होईल. बुलेट ट्रेन विदर्भात चालली ठीक आहे, ती इकडे मराठवाड्यातही यावी. समृद्धी महामार्ग नांदेडपासून पुढे हैद्राबादपर्यंत वाढवा, बुलेट ट्रेन नांदेड मार्ग हैदराबादपर्यंत न्यायला पाहिजे. आपण दोघांनी प्रयत्न केले तर हे स्वप्न पूर्ण होईल, असे अशोक चव्हाण देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून म्हणाले.

- Advertisement -

त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई-अहमदाबाद या बुलेट ट्रेनच्या कामात महाराष्ट्रात राजकारण आणले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात काम रखडले आहे. मात्र, गुजरातमध्ये काम वेगात आहे. जपान त्यासाठी अल्प दराने कर्ज देत आहे. हैदराबादपर्यंतच्या बुलेट ट्रेनला मी पाठिंबा पण देईन. पण तुम्ही मुख्यमंत्र्यांना समजावा की मुंबईतील बुलेट ट्रेनचे काम थांबवू नका. काही अधिकार्‍यानी सरकारची दिशाभूल केली. त्यातून राज्य सरकारने केंद्राच्या कुठल्याच कामात हिस्सा द्यायचे नाही, असे ठरवले. अशोकराव, तुम्ही मध्यस्थी करा आणि हे काम पूर्ण करा, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अ‍ॅडजस्ट करून घ्या…
देवेंद्र भाऊ आमचे महाविकास आघाडीचे काम उत्तम चाललेय, तुम्ही अ‍ॅडजस्ट करून घेतलं तर अजून उत्तम चालेल, असा टोला अशोक चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -