Saturday, May 8, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी बड्या नेत्यांनी ऑक्सिजन, रेमडेसिवीर मतदारसंघात पळवले, आदिवासी भागात सरकारचे दुर्लक्ष - फडणवीस

बड्या नेत्यांनी ऑक्सिजन, रेमडेसिवीर मतदारसंघात पळवले, आदिवासी भागात सरकारचे दुर्लक्ष – फडणवीस

राज्यात सर्वात जास्त कमी लसीकरण आदिवासी पाड्यात

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सर्वच जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार होताना पाहायला मिळतो आहे. त्यामुळे राज्यातील स्थिती चिंताजनक आहे. सर्व कोरोनाबाधितांना सेवा मिळाली पाहिते. दुर्दैवाना आपला महाराष्ट्र कोरोनाचा एपी संटेर झाला आहे. राज्यात सर्वच जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मदत पोहचली पाहिजे. परंतु बलशाली नेत्यांनी आपल्या जिल्ह्याकडे ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर जास्त पुरवले आहेत. त्यामुळे काही भागांत मात्र १०० ते २०० रेमडेसीवीर आणि पुरेसा ऑक्सिजन पुरवठा केला आहे. तर आदिवासी भाग, आदिवासी पाड्याकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष झाले असल्याचे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पालघर दौऱ्यादरम्यान माध्यमांशी बोलत होते. फडणवीसांनी म्हटले आहे की, राज्यात कोरोनाचा प्रकोप वाढला आहे. दुर्दैवाना आपला महाराष्ट्र कोरोनाचा एपी सेंटर झाला आहे. देशात सर्वाधिक कोरोनाबाधित आणि कोरानुळे मृत्यूंची संख्या महाराष्ट्रात जास्त आहे. महाराष्ट्रातील स्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे पाहायला मिळते आहे. राज्यात कोविड सेंटर महत्त्वाची आहेत.

- Advertisement -

पुर्वी कोरोनाच्या संसर्गाने परिवारातील एखादी व्यक्ती बाधित होत होता. परंतु यावेळी संपूर्ण परिवार कोरोनाबाधित होत आहे. आता सर्व वयोगटातील नागरिकांना कोरोनाची लागण होत आहे. सामाजिक स्तरातील लोक अधिक संक्रमित होताना दिसत आहेत. राज्यातील वाढता कोरोनाचा प्रकार पाहता आरोग्य यंत्रणा हे संपूर्ण हाताळण्याकरता कमी पडत आहे.

बड्या नेत्यांनी ऑक्सिजन, रेमडेसिवीर पळवले

आरोग्य यंत्रणा, डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफचे आभार मानले पाहिजेत. कोरोना आल्यापासून सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. संख्या वाढल्याने कठीण जात आहे. ७० ते ८० टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत. अशा रुग्णांना विलगीकरणात ठेवले पाहिजे. हे रुग्ण बाहेर फिरत असल्यामुळे कोरोना वाढत आहे. काही रुग्ण रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे रुग्णालयात जात आहेत. बेड मिळवत आहेत कारण त्यांच्यात भीती निर्माण झाली आहे. माईल्ड पेशंट किंवा मॉडरेट अशा रुग्णांना ऑक्सिजन मिळत नाही आहे. त्यामुळे त्यांची तब्येत खालावत आहेत. ऑक्सिजनची कमतरता पाहता केंद्राने १८०० टन ऑक्सिजन राज्याला दिला आहे. तसेच ४ लाख ७५ हजार रेमडेसिवीरचा कोटा राज्याला मिळाला आहे. याचे वाटप मात्र नीट होताना दिसत नाही आहे.

- Advertisement -

राज्यातील काही पॉवरफुल्ल नेते, मंत्री ऑक्सिजन, बेड, रेमडेसिवीर आपल्या जिल्ह्याकडे नेत आहेत. पालघरसारख्या जिल्ह्ययाला १०० रेमडेसीवीर पुरवले जात आहेत. ऑक्सिजन बेड दिले जात नाही आहेत. ऑक्सिजनची पालघरमध्ये कमतरता आहे. राज्यातील नेत्यांनी आपली मानसिकता ठेवावी की आपण राज्याचे मंत्री आहोत. त्यामुळे सर्वांना सारखीच मदत पोहचली पाहिजे. आपल्याच जिल्ह्यात सर्व यावे अशी मानसिकता ठेवू नये असेही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

आदिवासी भागात लसीकरण कमी

राज्यात सर्वात जास्त कमी लसीकरण आदिवासी पाड्यात झाले आहे. याचे कारण म्हणजे आदिवासी भागातील लोकांमध्ये भीती आहे. लसीकरणाबाबत त्यांना सांगण्याची गरज आहे. लसीकरण केल्यानंतर जीव वाचणार आहे याबाबत त्यांना सांगितले पाहिजे. प्रथम लसीचा डोस घेतला तरी लोकांना कोरोनाची लागण होते मात्र यामध्ये रुग्णाची तब्येत खालावत नाही. तसेच दुसरा कोरोना लसीचा डोस घेतला तरी आपण सुरक्षित राहतो कोरोनाची लागण झाली तरी आपल्याला गंभीर आजार होत नाही असेही फडणवीसांनी सांगितले आहे.

- Advertisement -