मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला सुस्साट वेग; शिंदे-फडणवीस सरकारने दिली मंजुरी

आज मंत्रिमंडळ बैठक झाली. या बैठकीत बुलेट ट्रेन प्रकल्पाला मंजुरी मिळाली असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा अतिमहत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन (Mumbai Ahmadabad bullet train project) प्रकल्पाला आता गती येणार आहे. कारण नव्याने स्थापन झालेल्या एकनाथ शिंदे सरकारने आता बुलेट ट्रेनसाठी सर्व प्रकारची मुंजरी दिली आहे. आज मंत्रिमंडळ बैठक झाली. या बैठकीत बुलेट ट्रेन प्रकल्पाला मंजुरी मिळाली असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. (Devendra Fadnavis and eknath shinde government give all permission to Mumbai to Ahmadabad Bullet train project)

हेही वाचा – बुलेट ट्रेनच्या कामात राजकारण

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प हा नरेंद्र मोदी यांचा अतिमहत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. २०२३ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणं अपेक्षित होता. मात्र, जमीन हस्तांतरण प्रक्रिया धीम्या गतीने सुरू असल्याने या प्रकल्पाला वेळ लागला. तसेच, कोविडच्या काळातही हे काम थांबले होते. त्यामुळे हा प्रकल्प लांबणीवर पडला. या प्रकल्पासाठी महाराष्ट्रातील केवळ २० टक्केच जमिनीचे हस्तांतरण झाले आहे. महाविकास आघाडी सरकारचा या प्रकल्पाला विरोध होता, त्यामुळे त्यांनी केंद्र सरकारला या प्रकल्पाबाबत उचित सहाय्य केलं नाही.

हेही वाचा – पेट्रोल ५ तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त, राज्य सरकारची व्हॅटमध्ये कपात

दरम्यान, आता राज्यात एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार सत्तेत येताच, मुंबई-अहमदाबाद प्रकल्पाला गती प्राप्त होणार अशा चर्चा रंगल्या होत्या. यासंदर्भात सरकारने आता सर्व प्रकारची मंजुरी दिली आहे. ५०८ किमीचा हा प्रकल्प असून यामुळे मुंबई ते अहमदाबाद प्रवास अवघ्या काही तासांमध्ये होणार आहे.

हेही वाचा – महाराष्ट्रात ‘बुलेट ट्रेन’ साठी लवकरच सर्वेक्षण

मुंबई ते अहमदाबादपर्यंत एकूण १२ स्थानकं असतील. यामध्ये आठ स्थानकं गुजरातमध्ये असून ४ स्थानकं महाराष्ट्रातील असतील. साबरमती ते वापीपर्यंत एकूण ३५२ किलोमीटरचा प्रवास गुजरातमध्ये असेल. या सेक्शनमध्ये ६१ किलोमीटरपर्यंत पिलर लागले असून १७९ किमीपर्यंत काम सुरू आहे.