घरमहाराष्ट्रनागपूरराज्याचे गृहमंत्री फडणवीसांसह आणखी एका मंत्र्याला दाम्पत्याकडून जीवे मारण्याची धमकी

राज्याचे गृहमंत्री फडणवीसांसह आणखी एका मंत्र्याला दाम्पत्याकडून जीवे मारण्याची धमकी

Subscribe

विदर्भवादी कार्यकर्ते असलेले बाबा मस्की आणि त्यांच्या पत्नी शोभा मस्की यांच्याकडून राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

नागपूर : विदर्भवादी कार्यकर्ते असलेले बाबा मस्की आणि त्यांच्या पत्नी शोभा मस्की यांनी आजपर्यंत अनेक विदर्भवादी प्रश्न सोडविण्यासाठी उभ्या राहिलेल्या आंदोलनात सहभाग घेतला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हे मस्की दाम्पत्य एका प्रश्नाला धरून आंदोलन करत आहे. या आंदोलनाकडे विदर्भातील दोन प्रमुख नेते असलेले राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या मस्की दाम्पत्याकडून देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी मस्की दाम्पत्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Devendra Fadnavis and Sudhir Mungantiwar receive death threats from Vidarbha activist couple)

हेही वाचा – कार्तिकी एकादशीच्या महापूजेला अडथळे निर्माण करण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही – मुख्यमंत्री

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, राजुरा शहरात राहणाऱ्या आणि विविध आंदोलनात सतत सहभागी होणाऱ्या बाबा मस्की आणि शोभा मस्की या दाम्पत्यानं सोशल मीडियावर शिवीगाळ करत जीवे मारण्याचा हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी गडचांदूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी या दांपत्यावर सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे. गडचांदूर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत पुढील कारवाई चालवली आहे. भाजप कार्यकर्त्यांनी या व्यक्तीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.

वेगळा विदर्भ, अतिक्रमित शेतकऱ्यांना शेतजमिनीचे पट्टे, वन्यजीवाद्वारे पिकांचे होणारे नुकसान यासंदर्भात भाष्य करताना देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पण थेट सोशल मीडियावर आणि ते ही एका दाम्पत्याकडून जीवे मारण्याची धमकी देणारा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. या प्रकरणात अद्यापही या दाम्पत्यावर अटकेची कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे पोलिसांकडून नेमकी काय कारवाई करण्यात येते? हे पाहणे आता महत्त्वाचे राहणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -