घरताज्या घडामोडीशाहू महाराजांचा अनादर करण्याचा हेतू नव्हता; फडणवीसांकडून दिलगिरी व्यक्त

शाहू महाराजांचा अनादर करण्याचा हेतू नव्हता; फडणवीसांकडून दिलगिरी व्यक्त

Subscribe

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनी केलेल्या ट्वीटमध्ये फडणवीसांनी शाहू महाराजांचा उल्लेख सामाजिक कार्यकर्ते असा केला होता. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्याविषयी संतापाची लाट उमटली होती.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा अनादर करणारे ट्वीट केल्याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शाहू महाराजांच्या स्मृतीदिनी अभिवादन करताना शाहू महाराजांचा उल्लेख सामाजिक कार्यकर्ते असा केला होता. यावरुन देवेंद्र फडणवीसांवर सर्व स्तरावरुन टिका करण्यात आली. खासदार छत्रपती संभाजीराजेंनी फडणवीसांकडे माफीची मागणी केली होती. खासदार छत्रपती संभाजीराजेंच्या ट्विटनंतर देवेंद्र फडणवीस यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

“माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कालच्या प्रकारावर सर्व शिव-शाहू भक्तांची माफी मागावी. माझ्यासाहित संपूर्ण राज्यातील शिव-शाहू भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत.” अशा आशयाचं ट्विट केलं होतं. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत शाहू महाराज यांचा अनादर करण्याचे कधी माझ्या मनात सुद्धा येऊ शकत नाही. तथापि यामुळे भावना दुखावल्या गेल्यात. सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो, असं म्हटलं आहे.

- Advertisement -

“छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनी केलेल्या ट्विटमध्ये चूक झाल्याचे लक्षात येताच लगेच मी ते ऑफिसला दुरुस्त करण्यास सांगितले. शाहू महाराज यांचा अनादर करण्याचे कधी माझ्या मनात सुद्धा येऊ शकत नाही. तथापि यामुळे भावना दुखावल्या गेल्यात. सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो,” अशा शब्दांत दिलगिरी व्यक्त केली.


हेही वाचा – मृतांच्या बाजूला रुग्णांवर उपचार; मुंबईकरांना कोणीच वाली नाही का? – देवेंद्र फडणवीस

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -