Tuesday, March 18, 2025
27 C
Mumbai
Homeमहाराष्ट्रDevendra Fadnavis : जनतेने जास्त व्याज देणाऱ्या योजनांच्या अमिषास बळी पडू नये, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Devendra Fadnavis : जनतेने जास्त व्याज देणाऱ्या योजनांच्या अमिषास बळी पडू नये, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Subscribe

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेने जास्त व्याज देणाऱ्या योजनांच्या अमिषास बळी पडू नये, असे आवाहन विधान परिषदेमध्ये केले.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी टोरेस ज्वेलरी ब्रँड चालविणाऱ्या प्लॅटीनम हर्न प्रा. लि. कंपनीने गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक प्रकरणाचा मुद्दा प्रश्नोत्तराच्या तासाला उपस्थित केला. या प्रश्नाला गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी उत्तर दिले. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेने जास्त व्याज देणाऱ्या योजनांच्या अमिषास बळी पडू नये, असे आवाहन विधान परिषदेमध्ये केले. (Devendra Fadnavis appealed to the public not to fall prey to schemes that offer high interest rates)

शशिकांत शिंदे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना योगेश कदम म्हणाले की, टोरेस प्रकरणी पोलीस प्रशासन योग्य कार्यवाही करत आहे. राज्यात आर्थिक गुंतवणुकीच्या व्यवहारासाठी येणाऱ्या कंपन्या खऱ्या आहेत की फसव्या हे तपासण्यासाठी व भविष्यात टोरेस कंपनीसारखे आर्थिक गुन्हे होऊ नयेत यासाठी महाराष्ट्र इंटेलिजेन्स युनिटची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच टोरेस प्रकरणी फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेनुसार कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती दिली. मात्र त्यावर विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे मुख्यमंत्री याप्रकरणी उत्तर दिले.

हेही वाचा – Shaktipeeth Expressway : शक्तिपीठ महामार्ग करायचाय, लादायचा नाही; फडणवीसांचे विरोधकांना उत्तर

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जादा व्याज देणाऱ्या 99 टक्के योजना या फसव्या असतात. कोणीही अशा प्रकारे जादा व्याज देऊ शकत नाही. बँकेच्या व्याजदरापेक्षा दोन ते चार टक्के जास्त व्याज दिले जाणे शक्य आहे. पण त्यापेक्षा जास्त किंवा भरघोस व्याज देणे कोणालाही शक्य होत नाही. त्यामुळे असे जादा व्याजाचे अमिष देणाऱ्या योजना फसव्याच असतात. त्यांच्या अमिषाला जनतेने बळी पडू नये आणि अशा फसव्या योजनांमध्ये गुंतवणूक करू नये, असे आवाहन फडणवीस यांनी केले.

हेही वाचा – Council : कर्मचाऱ्यांच्या हक्कांच्या पैशांवर डल्ला, एसटी कामगारांच्या पीएफ प्रकरणी परब -सरनाईक आमनेसामने