कोरोना काळात राजेश टोपेंचे उत्तम काम, पण अधिवेशनात बोलणारच – फडणवीस

Devendra Fadnavis Rajesh Tope

गेली दीड वर्षे आव्हान घेऊन आलेला काळ होता. सुरूवातीला एखाद्या देशातला हा रोग वाटत होता, तो सगळ्या जगभरात पसरला. पहिल्या लाटेत कोरोना काय आहे याची माहिती नव्हती. अंधारात चाचपडत होतो त्यावेळी आरोग्य सेवेने, डॉक्टर्स, फ्रंटलाईन्स वर्कर्सने या अंधारातही लोकांना मार्ग दाखवण्याची किमया केली. भारतात अनेक देवदूतांनी मानवता काय असते हे दाखवून देण्याचे काम केले. अनेक उदाहरणे आपण पाहतोय. प्रत्येक आवाहनाला धावून जाणारी भारतीय संस्कृती हीच आहे. फीट आहे तो जगेल हा आमचा विचार नाही. जो जन्माला आला तो जगेल आणि समाज त्याला जगवेल अशी भारतीय संस्कृती आहे. राज्यातील फ्रंटलाईन वर्कर्सच्या कौतुक सोहळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात राज्याचे आरोग्यमंत्री डॉ राजेश टोपे यांच्या कामाचेही कौतुक केले. पण त्याचवेळी ज्या उणिवा भासल्या आहेत, त्याबाबत अधिवेशनात बोलणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

कोरोनाच्या काळात प्रत्येकाने चांगल काम करण्याचे प्रयत्न केले. देशानेही कोरोनाच्या परिस्थितीत सामोरे जाण्याचे काम केले आहे.  कोरोनाच्या काळात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अतिशय उत्तम काम केले. या कठीण काळात त्यांनी खूप मेहनत घेतली. वेगवेगळ्या प्रकारे लोकांपर्यंत कशा पद्धतीने पोहचता येईल यासाठीचे त्यांचे प्रयत्न होते. आमच्या आणि टोपे यांच्या पद्धतीमध्ये फरकही असतील. या पद्धतीवर आम्ही टीकाही करू, पण राजेश टोपे यांच्या हेतूबाबत कोणीही शंका उपस्थित करू शकत नाही असे मत राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. राजेश टोपे यांनी केलेल्या कोरोना काळातील कामासाठी फडणवीस यांनी टोपेंचे तोंडभरून कौतुक केले. पण ज्या काही उणिवा आणि त्रुटी राहिल्या आहेत, त्यावर येत्या अधिवेशनात बोलणारच असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

डॉक्टर्स डे निमित्ताने सन्मान देवदूतांचा सोहळा कार्यक्रम

डॉक्टर्स डे निमित्ताने सन्मान देवदूतांचा सोहळा कार्यक्रम

Posted by Devendra Fadnavis on Saturday, July 3, 2021

जगाच्या पाठीवर मृत्यूदर भारताचा आहे. अनेक देवदुतांनी मानवता काय असते हे दाखवून देण्याचे काम केले आहे. डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी, पत्रकारांपर्यंत, उपचारासापासून ते प्रेताला अग्नी देण्यापर्यंतचे लोक आपण कोरोनाच्या काळात पाहिले. कोरोना काळात प्रत्येकाने आपल्या परीने मदत करण्याचे काम केले. देशात अंतर्गत लसीकरणाच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात देशातील कोरोनाचा मृत्यूदर कमी ठेवण्यासाठी मदत झाली. भारतातील औषध क्षेत्रातील व्यक्ती, वैज्ञानिक यांच्यामुळे देशातील लसीकरण शक्य झाले. संकटाच्या काळात आपला स्वार्थ सोडून अनेक देवदूतांनी मदत केली. प्रत्येक शहरात प्रचंड मोठ काम या काळात करण्यात आले. कोरोनाच्या काळात तीनवेळा दौरा केला. पहिल्या लाटेच्या लॉकडाऊननंतर आरोग्य कर्मचाऱ्यांना धीर देण्यासाठी महाराष्ट्रात दौरा केला. संपुर्ण दौऱ्यात पहायला मिळाले, अनेक माणस ही पर्वताएवढी मोठी असतात असेही फडणवीस म्हणाले.

आठवलेंच व्यक्तीमत्व चैतन्य निर्माण करणारे – फडणवीस

कोरोना विषाणूपेक्षा त्याच्या भीतीमुळे अनेक व्यक्ती मृत्यूमुखी पडल्या. त्यामुळेच या कोरोनाच्या काळात सभोवताली चैतन्य वाढवणाऱ्या व्यक्तींमुळे मनस्थिती चांगली राहण्यासाठी तसेच धैर्य मिळण्यासाठीही अनेकांना मदत झाली. खासदार रामदास आठवले यांच्या उपस्थितीनेही सर्वत्र चैतन्य निर्माण होत असते. ज्यांच्यासोबत आठवले आहे त्याठिकाणी चैतन्य निर्माण करणारे आणि जगण्याची इच्छा ताजी करणारे असे व्यक्तीमत्व म्हणजे रामदास आठवले आहेत. त्यामुळेच या कोरोनाच्या काळातही त्यांच्या नुसत्या उपस्थितीनेही चैतन्य निर्माण होणार असे वातावरण तयार झाले असेही फडणवीस म्हणाले.