घरताज्या घडामोडीफडणवीसांकडून राज्यपालांकडे सरकारच्या बहुमत चाचणीची मागणी

फडणवीसांकडून राज्यपालांकडे सरकारच्या बहुमत चाचणीची मागणी

Subscribe

देवेंद्र फडणवीस हे राजभवनावर पोहोचले...

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची राजभवनावर भेट घेतली आणि ठाकरे सरकारची बहुमत चाचणी घेण्याची मागणी केली. त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार आशिष शेलार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजप नेते श्रीकांत भारतीय होते.

देवेंद्र फडणवीसांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली. त्यानंतर ते मुंबईत दाखल झाले. त्यानंतर सागर निवासस्थानी भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांसोबत त्यांनी बैठक घेतली. ही बैठक पार पडल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे राजभवनावर पोहोचले.

- Advertisement -

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार मागील सात दिवसांपासून आसामच्या गुवाहाटीतील रॅडिसन ब्लू या हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत. त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून बंडाचा झेंडा फडकावला आहे. तसेच ते मुंबईत येणार असल्याचे सांगण्यात येते.

याच पार्श्वभूमीवर आतापर्यंत वेट अँण्ड वॉचच्या भूमिकेत असलेल्या भाजपाने सक्रिय होत. राज्यपालांना ई-मेलवरून आणि प्रत्यक्ष पत्र देण्यात आले आहे. त्याद्वारे ठाकरे सरकारची शक्तीपरीक्षा घेण्याची मागणी करण्यात आली आहे. या पत्रामध्ये राज्याची आताची काय परिस्थिती आहे. ते मांडण्यात आले आहे. शिवसेनेचे ४० आमदार बाहेर असल्याची माहिती आहे. त्यामुळे हे सरकार अल्पमतात आल्याचे चित्र आहे. परिणामी मुख्यमंत्र्यांनी फ्लोअर टेस्टला सामोरे जावे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

- Advertisement -

राज्यपालांची पुढची भूमिका आता काय असणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. शिवसेना व अन्य आमदारांचे बंड लक्षात घेता राज्यात लवकरच सत्तापालट होणार, अशी दाट शक्यता आहे.


हेही वाचा : संभाजीनगरच्या नामकरणाचे निमित्त… उद्याची मंत्रिमंडळ बैठक शेवटची


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -