घरताज्या घडामोडीओबीसींचे आरक्षण संपविण्याचे षडयंत्र, देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर निशाणा

ओबीसींचे आरक्षण संपविण्याचे षडयंत्र, देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर निशाणा

Subscribe

राज्यातील भ्रष्टाचारी, घोटाळेबाज, अत्याचारी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आज गडचिरोली भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाजनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, खा. अशोक नेते, राजे अंबरिशराव आत्राम, आ. देवराव होळी, कृष्णा गजबे, किर्तीकुमार भांगडिया आणि इतरही नेते यावेळी उपस्थित होते. त्याप्रसंगी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केले. यावेळी महाविकास सरकारने ओबीसींचे आरक्षण घालविले. ओबीसींचे आरक्षण संपविण्याचे षडयंत्र होत आहे. जोपर्यंत भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता जिवंत आहे. तोपर्यंत आम्ही ओबीसी आरक्षण काढू देणार नाही, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

ओबीसींचे आरक्षण संपविण्याचे षडयंत्र

आदिवासींसाठीच्या अन्नधान्याच्या योजनेत प्रचंड भ्रष्टाचार हे सरकार करते आहे. कुत्रा देखील खाणार नाही, असे धान्य आदिवासींना देण्यात येते आहे. आदिवासींच्या तोंडचा घास पळविणारे हे पापी सरकार आहे. मतांसाठी ओबीसींचा वापर करतात. ओबीसींसाठी पहिला संवैधानिक आयोग मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तयार केला. मात्र, महाविकास सरकारने ओबीसींचे आरक्षण घालविले. ओबीसींचे आरक्षण संपविण्याचे षडयंत्र होते आहे. भाजपाचा एकही कार्यकर्ता जिवंत आहे, तोवर हे राजकारण संपू देणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आम्ही ओबीसी आरक्षण काढू देणार नाही

अखेरच्या क्षणापर्यंत भाजपा ओबीसी आरक्षणासाठी संघर्ष करीत राहील. जोपर्यंत भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता जिवंत आहे. तोपर्यंत आम्ही ओबीसी आरक्षण काढू देणार नाही. त्यासाठी जी काही किंमत लागेल. ती किंमत मोजण्याची तयारी भाजपा पक्षामध्ये आहे. हे युद्ध सिंहासनाकरिता आणि राजकीय नसून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याकरता आहे. ठाकरे सरकारला ओबीसींचं आरक्षण नकोय, ओबीसी आरक्षणासाठी गंभीर नाही, असं फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

धानाला बोनस, कृषीपंपाला २४ तास वीज, वीजतोडणी बंद करणे, कर्जमाफी आणि अनुदानाची रक्कम त्वरित देण्यात यावी, अवकाळी, अतिवृष्टी, वादळ, किडीची मदत तत्काळ देण्यात यावी, नवाब मलिक यांचा राजीनामा तत्काळ घ्यावा अशा विविध १६ मागण्यांसाठी हा मोर्चा आहे.

आम्ही अन्याय सहन करणार नाही. अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर तुमचं तख्त पलटवून टाकण्याची ताकतही या गडचिरोलीच्या मातीमध्ये आणि जनतेमध्ये आहे. हे सांगण्याकरिता आपण गडचिरोलीमध्ये आलो आहोत. आपण जन आक्रोश मोर्चाची सुरूवात गडचिरोलीमधून केली. या मोर्चाची सुरूवात गडचिरोलीमधून करण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्राच्या या टोकावरून जो आवाज बुलंद होतो. तो आवाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये क्रांती घडवतो. त्यामुळे आम्ही याची सुरूवात या गडचिरोलीपासून केली.

महाविकास सरकारमध्ये भ्रष्टाचाराची ट्वेंटि-ट्वेंटी

या महाविकास सरकारमध्ये भ्रष्टाचाराची ट्वेंटि-ट्वेंटी सुरू आहे. मुंबईतील बिल्डरांचा कर थकला आहे, हिंमत असेल तर तो वसुल करा. त्यांच्याकडून मालपाणी मिळते, म्हणून तेथे ढिल आणि आमच्या शेतकर्‍यांकडून जुलमी वसुली सुरू. बारमालकांची फी ५० टक्के कमी केली. पण, गडचिरोली, नंदूरबारमध्ये शेतकर्‍यांचे वीजबिल ५० टक्के कमी करू, असे त्यांना वाटले नाही. विदेशी दारुवर कर अर्धा केला. पण, शेतकर्‍यांना कोणतीही मदत केली नाही.

या सरकारला गरिबांची नाही, तर बेवड्यांची चिंता अधिक आहे. हे सरकार इतके नालायक आहे की, वेश्यांसाठी दिल्या जाणार्‍या निधीत सुद्धा त्यांनी भ्रष्टाचार केला. असे करणार्‍यांना काय म्हणतात, ते मी सांगणार नाही. तो शब्द संजय राऊत वापरतात. धानाचे पैसे द्यायचे किती जिल्ह्यांना. विदर्भातील ५ आणि कोकणातील ३ जिल्हे पण, हे १२५ कोटी रुपये सुद्धा सरकार द्यायला तयार नाही. मुंबई महापालिकेतील स्थायी समितीचा अध्यक्ष ४०० कोटींचा भ्रष्टाचार करतो.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवर आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह खासदार, आमदारांनी विजेचा प्रश्न मांडला. शेतकऱ्याची वीज तोडण्याचा पराक्रम हे नालायक लोकं या ठिकाणी करताहेत. मुंबईमध्ये बिल्डरांचा २३०० कोटींचा टॅक्स थकला आहे. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर तो टॅक्स वसूल करा. असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे.

काय सांगायचे? बांधावर जाऊन ५० हजार देऊ. पण, आज स्थिती काय आहे? ५ हजार रुपये शेतकर्‍यांना द्यायला तयार नाही. आमच्या पाठित सोडा, या सरकारने सामान्य माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार सामान्यांचा विचार करीत नसले तरी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे सरकार सामान्यांचा विचार करते. त्यांच्याकडून अधिकाधिक मदत प्रत्येकाला मिळते आहे, असं फडणवीस म्हणाले.


हेही वाचा : Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धात भारत महासत्तेचे केंद्र का बनला?, काय आहे तज्ज्ञांचे मत


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -