घरताज्या घडामोडीDevendra Fadnavis : ठाकरे सरकार सत्तेत आल्यापासून विदर्भात एकही अधिवेशन नाही, अन्...

Devendra Fadnavis : ठाकरे सरकार सत्तेत आल्यापासून विदर्भात एकही अधिवेशन नाही, अन् निधीही नाही, फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका

Subscribe

ज्या प्रकारे मागच्या वेळी सभागृहात चर्चा सुरू असताना ती चर्चा थांबवून विधेयक पास करून घेतलं. ही तानाशाही का चालवून घ्यायची. तुम्हाला जर विरोधकांची आवश्यकता नसेल. तर तुम्ही आम्हाला कशासाठी निमंत्रित करता. अशा प्रकारच्या तीव्र भावना आम्ही मांडल्या आहेत, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

विदर्भात एकही अधिवेशन नाही, अन् निधीही नाही

देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, आज बीएसीईमध्ये पुन्हा एकदा या सरकारचा विदर्भ विरोधी चेहरा हा उघड झालेला आहे. मागील वेळेस नागपूरला अधिवेशन घेऊ म्हणून सांगितलं. परंतु अधिवेशन पुन्हा एकदा मुंबईत घेण्याचा निर्णय ठाकरे सरकारने केलाय. विशेषत: आम्हाला याची कल्पना आली होती. कारण मागचं अधिवेशन झाल्यानंतर कालपर्यंत एक पैसा देखील नागपूर अधिवेशनासाठी दिला नाही. तसेच एक टेंडर देखील बोलावलं नाही. त्याचप्रमाणे सफाईचं काम देखील त्यांनी केलं नाही, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

- Advertisement -

या सरकारने विदर्भातील जनतेचा विश्वासघात केलाय

नागपूर अधिवेशन घ्यायचं हे केवळ दाखवण्यापूर्तीच होतं. परंतु त्यांना अधिवेशन घ्यायचं नव्हतं हे ठरलेलं होतं. त्यामुळे या सरकारने विदर्भातील जनतेचा विश्वासघात केलाय. विदर्भाविरोधी चेहरा जो सरकारचा उघड पडलेला आहे. आम्ही त्याचा निषेध बीएसईच्या बैठकीत केला आहे, असं फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

आमच्या बीएसईमध्ये साधारणपणे ३ तारखेपासून अधिवेशन सुरू करण्याचा निर्णय झालेला आहे. अधिवेशनात कोणत्याही प्रकारची अडचण न येता हे अधिवेशन पुर्ण झालं पाहीजे, असं आम्ही सरकारला सांगितलं आहे. परंतु जो पर्यंत ते होत नाहीत. तोपर्यंत आम्ही त्याच्यावर विश्वास ठेऊ शकत नाही, असं फडणवीस म्हणाले.


हेही वाचा : Ashwani Kumar resigns: पंजाब काँग्रेसला मोठा धक्का, अश्विनी कुमार यांचा काँग्रेसला रामराम


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -