घरताज्या घडामोडीप्रभागांची कितीही तोडफोड केली तरी महानगरपालिकांवर भाजपचाच झेंडा - देवेंद्र फडणवीस

प्रभागांची कितीही तोडफोड केली तरी महानगरपालिकांवर भाजपचाच झेंडा – देवेंद्र फडणवीस

Subscribe

मुंबईत विशेषता काही वॉर्ड्सची तोडफोड करुन आपल्याला पाहिजे तसे वॉर्ड तयार करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांचा आहे.

आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी सत्ताधारी महाविकास आघाडी वॉर्ड रचना, प्रभाग रचनांची तोडफोड करत आहेत. त्यांनी कितीही तोडफोड केली तरी मुंबई महानगरपालिकेवर भाजपचाच झेंडा फडकणार असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडीची मंत्रिमंडळ बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत महानगरपालिका रचनेवर चर्चा होण्याची शक्यता आहे. यावरुन फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पाठवलेल्या पत्रावरुन निशाणा साधलाय, यामध्ये मुख्यमंत्री कार्यालयाचा अपरिपक्वपणा दिसून आला असल्याचे फडणवीस यांनी म्हटलं आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गोव्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावरुन मुंबईत परतले आहे. यावेळी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुंबईतील प्रभाग रचनेबाबत विचारण्यात आले होते. यावर फडणवीस यांनी म्हटलं आहे की, मंत्रिमंडळ बैठकीत काय प्रस्ताव आहे. याबाबत मला कल्पना नाही. परंतु मला अस वाटतं की, वॉर्ड रचना, प्रभाग रचना अशी कुठलीही रचना केली. तरीही मुंबई महानगरपालिका असो, अन्य महानगरपालिका असो अम्हालाच चांगले यश मिळणार आहे. मुंबईत विशेषता काही वॉर्ड्सची तोडफोड करुन आपल्याला पाहिजे तसे वॉर्ड तयार करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांचा आहे. पण आम्ही त्यासंदर्भात सजग आहोत. निवडणूक आयोगाला याबाबतची कल्पना दिली आहे. निवडणूक आयोगाना काही कारवाई केली नाही तर आम्ही न्यायालयात जाऊ असे फडणवीस यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री कार्यालयाचा अपरिपक्वपणा त्या पत्रातून पाहायला मिळत आहे. राज्यपालांनी पत्र प्रेसमद्ये दिलं नाही. राज्यपालांचे पत्र म्हणजे आदेश नसतो, ते कारवाई करा असे सांगत असतात. ही आताची परिस्थिती नाही तर परंपरागत चालत आलेली परिस्थिती असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

पुढील वर्षी महानगरपालिका निवडणुका

महानगरपालिकांच्या निवडणुका २०२२ मध्ये घोषित करण्याची शक्यता आहे. यामध्ये एकूण १५ महापालिकांमध्ये निवडणूक होणार आहेत. या निवडणुकांमध्ये महापालिकेत प्रभाग पद्धती कशी असावी, नगरपचायत आणि नगरपालिकांमध्ये प्रभाग पद्धत कशी असावी याबाबत राज्यमंत्रिमंडळामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हेही वाचा : पवारांनी आबा, पतंगरावांच्या घरातच उमेदवारी दिली, पण काँग्रेसनं सातवांच्या घरात.. चंद्रकांत पाटलांचा टोला


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -