घरमहाराष्ट्रDevendra Fadnavis : छत्रपती शिवराय हे आमचे दैवतच; कुर्ल्यात मंदिराचे उद्घाटन

Devendra Fadnavis : छत्रपती शिवराय हे आमचे दैवतच; कुर्ल्यात मंदिराचे उद्घाटन

Subscribe

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, आज खरंच माझ्यासाठी सौभाग्याचा दिवस आहे. कारण, 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या निमित्ताने आम्ही आग्र्याला गेलो होते. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील काही सहकारी सोबत होते. आग्र्याला त्या किल्ल्यात गेल्यानंतर आमच्या अंगावर शहारा आला.

मुंबई : कुर्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज 21 फेब्रुवारी लोकार्पण पार पडले. छत्रपती शिवराय हे आमचे दैवतच असून, आम्हाला राज्य हवं पण छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासारखं सेवेकरिता हवं असल्याचेही ते यावेळी म्हणाले. (Devendra Fadnavis Chhatrapati Shivarai is our God Inauguration of temple in Kurla by Fadnavis)

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, आज खरंच माझ्यासाठी सौभाग्याचा दिवस आहे. कारण, 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या निमित्ताने आम्ही आग्र्याला गेलो होते. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील काही सहकारी सोबत होते. आग्र्याला त्या किल्ल्यात गेल्यानंतर आमच्या अंगावर शहारा आला. आजही त्या किल्ल्याची प्रत्येक भींत छत्रपतींचा बाणेदारपणा वर्णन करत होती. ज्याप्रकारे त्या काळच्या अखिल हिंदुस्थानच्या बादशाहला छत्रपतींनी थेट सुनावलं. आणि हा राजा झुकणार, हा राजा दबणार नाही अशी गर्जना त्यांनी केली. त्यानंतर नजरकैदेत ठेवण्यात आले. परंतु त्यानंतर त्यांच्या मुत्सदेगिरीनंतर ते तेथून सुटले आणि त्यांनी स्वराजाची स्थापना केली. मला असं वाटतं तेथे गेल्यानंतर जी अनुभूती मला झाली अगदी तोच अनूभव आणि तीच अनुभूती आज या मंदिरामध्ये आल्यानंतर झाल्याचे फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमच्याकरिता छत्रपती शिवराय हे आमचे दैवतच आहेत. छत्रपती शिवराय नसते तर आज आपण कोणीही याठिकाणी बसलेलो नसतो. ज्या स्वतंत्र हिंदुस्थानाकरिता देव, देश आणि धर्माकरिता काम करतो आहे, ज्या स्वतंत्र हिंदुस्तानामध्ये पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात विकसित भारताची संकल्पना रचण्यात आली, त्या विकसित भारतामध्ये सांस्कृतिक मंदिर पाहू शकलो त्याची मुहूर्तमेढ ही छत्रपती शिवरायांनी रोवली आहे. ज्या काळामध्ये या भारतातले अनेक राजे आणि राजवाडे ते क्षमता संपलेला होती. अशा काळामध्ये आई जिजाऊंनी बाळ शिवरायांना सांगितलं की, आपल्याला गुलाम जगायचं नाही.

हेही वाचा : Jayant Patil on Govt : व्यापाऱ्यांना तारा आणि शेतकऱ्यांना मारा…कांदा निर्यातबंदीवरुन जयंत पाटील भडकले

- Advertisement -

आजूबाजूला या हिंदुस्थानावर संकट आलं आहे. कशा प्रकारे धर्माची विटंबना चालली आहे. बहिणींवर अत्याचार होतायेत. रोज आपल्याला चिरडलं जात आहे. कशा प्रकारे अभिमान आणि आत्माभिमान हा पूर्णपणे चिरडला जातोय. याच्याविरुद्ध तुला लढावंच लागेल आणि हे जे काही विचार होते त्या विचारांचं रोपण अभिमान आणि आत्मतेजाचं रोपण आई जिजाऊंनी छत्रपती शिवरायांमध्ये केलं. आणि शिवरायांनी आई जगदंबेचा आशीर्वाद घेऊन मैदानात उतरले. यामुळेच आपण त्यांना आज युगपुरुष म्हणून संबोधतो.

हेही वाचा : Yugendra Pawar: ‘शरद पवार म्हणतील तसं…’; आणखी एक पवार अजित पवारांविरोधात मैदानात

पुढे बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणात सांगितले की, आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःला छत्रपती घोषित तर केलं पण केल्यानंतर एकही दिवस राज सिंहासनावर बसले नाही. एकही दिवस त्यांनी भोग केला नाही. एकही दिवस त्यांनी मिरवलं नाही. छत्रपती झाल्याबरोबर दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा स्वराज्याच्या विस्ताराकरिता ते निघाले आणि आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्याकरिता तेच छत्रपती शिवाजी महाराज आमची प्रेरणा आहे. त्यामुळे आम्हाला याठिकाणी राज्य हवं आहे पण ते छत्रपतींप्रमाणे सेवा करण्याकरिता हवं आहे. असेही यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -