Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी Love Jihad Cases: राज्यात लव्ह जिहाद प्रकरणांची संख्या मोठी, फडणवीसांचा दावा

Love Jihad Cases: राज्यात लव्ह जिहाद प्रकरणांची संख्या मोठी, फडणवीसांचा दावा

Subscribe

राज्यात लव्ह जिहाद प्रकरणांच्या (Love Jihad Cases) संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. राज्यातील बेपत्ता व्यक्तींच्या तक्रारींच्या तपासादरम्यान मोठ्या प्रमाणात लव्ह जिहादची प्रकरणं उघडकीस आली आहेत. यामध्ये राज्यात हरवलेल्या तक्रारींच्या शोधण्याचे प्रमाण ९० ते ९५ टक्के इतके आहे.

काही प्रकरणांमध्ये खोटी आश्वासनं आणि ओळख दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे काही प्रकरणांमधून आढळून आले आहे. तसेच विवाहित पुरुषही महिलांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होते. लव्ह जिहादची प्रकरणंही मोठ्या प्रमाणात समोर आली आहेत, असं फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

लव्ह जिहादवर आम्ही कायदा आणण्याचा विचार करत आहोत. यासंदर्भात सध्या अस्तित्वात असलेल्या विविध कायद्यांचा अभ्यास आम्ही करत आहोत. लव्ह जिहाद हा एक असा शब्द आहे की, तो (दक्षिणपंथी) कार्यकर्त्यांकडून वापरला जातो. मुस्लिम पुरुष लग्नाच्या बहाण्याने हिंदू स्त्रियांना इस्लाममध्ये धर्मांतरित करत असल्याचा आरोप त्यांच्याकडून केला जातो, असं देवेंद्र फडणवीस (devendra Fadnavis) म्हणाले.

महाराष्ट्रात लव्ह जिहादची (Love Jihad) एक लाखांपेक्षा जास्त प्रकरणं समोर आली आहेत, असं राज्याचे महिला बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी बुधवारी (8 मार्च) विधानसभेत सांगितलं. महाराष्ट्रात एक लाखांपेक्षा जास्त लव्ह जिहादची प्रकरणं समोर आल्याने कुठे ना कुठे समाज व्यथित आहे. लव्ह जिहाद आणि महिलांवरील अत्याचार यामुद्द्यांवर राज्यभरात मोठ्या संख्येने मोर्चे निघत आहेत. राज्यात पुन्हा श्रद्धा वालकर हत्याकांड घडू नये ही सरकारची जबाबदारी आहे, असं मंगल प्रभात लोढा म्हणाले होते.


- Advertisement -

हेही वाचा : Ajit Pawar : रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा, अजित पवारांची मागणी


 

- Advertisment -