घरताज्या घडामोडीLata Mangeshkar : शतकानुशतकं लतादीदींचा तो आवाज आम्हाला प्रेरणा देत राहील, देवेंद्र...

Lata Mangeshkar : शतकानुशतकं लतादीदींचा तो आवाज आम्हाला प्रेरणा देत राहील, देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना

Subscribe

भारतरत्न, गानकोकिळा लता मंगेशकर यांचं आज निधन झालं. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लतादीदींबाबत शोक भावना व्यक्त केली आहे. शतकानुशतकं लतादीदींचा तो आवाज आम्हाला प्रेरणा देत राहील, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, विविध विशेषणांनी ज्यांना संबोधलं जात होतं. खऱ्या अर्थानं संपूर्ण भारतीयांच्या भावविश्वामध्ये ज्यांनी एक आपली छाप उमवटली होती. अशा सर्व भारतीयांच्या लाडक्या आणि जगप्रसिद्ध गायिका लतादीदी यांच्या निधनामुळे भारतीय संगीताचा आत्माच निघून गेला.

- Advertisement -

अर्थातचं तो आवाज अजरामर आहे

लतादीदींना अनेक भाषांमध्ये हजारो गाणी म्हटली. इतक्या मोठ्या प्रमाणात गाणं म्हणण्याचा एक रेकॉर्ड त्यांनी तयार केला. तसेच सर्वच भाषांमध्ये त्यांची गाणी अतिशय प्रसिद्ध होती. अनेक दशकं प्रत्येकाच्या मनाला भुरळ घालणारा हा आवाज कधी शांत होईल, असं आम्हाला वाटलं नव्हतं. अर्थातचं तो आवाज अजरामर आहे आणि शतकानुशतकं तो आवाज आम्हाला प्रेरणा देत राहील.

 लतादीदींचा तो आवाज आम्हाला प्रेरणा देत राहील

लतादीदी या उत्तम गायिका होत्याच. परंतु एक व्यक्ती म्हणून त्यांचं एक संवेदनशील व्यक्तिमत्व होतं. विशेषत: प्रचंड राष्ट्रभक्त अशा प्रकारचा संपूर्ण परिवार आहे. लतादीदी या राष्ट्रीय विचाराने प्रेरीत होत्या. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर असीम श्रद्धा ही लतादीदींची त्या ठिकाणी होती. कुठल्याही राष्ट्रकार्यामध्ये आपलंही समर्पण असलं पाहीजे. अशा प्रकारच्या भावनेनं त्या जीवनभर कार्यरत होत्या. लतादीदींविना या जगाची कल्पना करणं अत्यंत कठीण आहे. पण व्यक्तीमत्व आणि आवाज हा नेहमीच आम्हाला प्रेरणा देत राहील.

- Advertisement -

आज त्यांचं अंत्यदर्शन घेण्याकरीता स्वत: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल होणार आहेत. आपण सर्वांनी अतिशय शाश्रूनयनांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करूयात, अशा शब्दांत फडणवीस यांनी शोक भावना व्यक्त केली.


हेही वाचा : Lata Mageshkar : ठाकरे आणि मंगेशकर कुटुंबियांचे जुने स्नेहबंध, मुख्यमंत्र्यांकडून आठवणींना उजाळा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -