घरमहाराष्ट्रनागपूरचंद्रशेखर बावनकुळे मंत्रालयातील किडे, सत्कार समारंभात फडणवीसांची कोपरखळी

चंद्रशेखर बावनकुळे मंत्रालयातील किडे, सत्कार समारंभात फडणवीसांची कोपरखळी

Subscribe

नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याने नागपूरमध्ये त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या समारंभात भाजपाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार, आमदार, इतर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बावनकुळेंचं कौतुक करताना एक उदाहारण दिलं. चंद्रशेखर बावनकुळे मंत्रालयातील किडे असून ते एखादं काम पूर्ण करूनच आणतात, असं फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, चंद्रशेखर बावनकुळे आणि कृष्णाजी खोपडे हे मंत्रालयातील किडे आहेत. ते मंत्रालय पोखरत पोखरत जातात आणि कामं करूनच आणतात, असं मी गंमतीने म्हणतो. विरोधी पक्षात असताना आमचं काम हेच होतं की फायली तयार करून पैसे छापत बसायचं. हे काम बावनकुळे यांचं होतं. मंत्र्यांचा प्रस्ताव येणार नाही, पण बावनकुळेंचा प्रस्ताव बजेटमध्ये येणारच, असं त्यांचं कार्य होतं.ॉ

- Advertisement -


बावनकुळेंच्या मतदारसंघात जास्त पैसे गेल्याचं अनेकजणांनी अर्थमंत्र्यांना सांगितलं. त्यावेळी अर्थमंत्र्यांनी बावनकुळेंनी पाठवपुरावा केल्यानेच त्यांच्या मतदारसंघात काम केल्याचं कबूल केलं आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

विशेषतः ऊर्जा खात्यात काम करताना त्यांनी कठीण काम केलं. अनेक रिफॉर्म्स केले. वीज खरेदीचे दर आपल्याकडे जास्त होते. वीजनिर्मितीची कॉस्ट जास्त होती. त्यामुळे वीज वितरण कंपनीलाही जास्त पैशांनी वीज विकत घ्यावी लागायची. त्यातील अडचणी पकडून बावनकुळेंनी वीज निर्मितीची कॉस्ट कमी आणली. विकत आणलेल्या वीजेच्या किंमतीही कमी केल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना १६.१७ तास वीज देऊ शकलो. मराठवाडा, विदर्भाला वीज देऊ शकलो. तिन्ही कंपन्या नफ्यामध्ये आणणायचं काम बावनकुळेंनी केल, असंही फडणवी म्हणाले.

- Advertisement -

महाराष्ट्राच्या इतिहासतील ते एकमवे मंत्री आहेत की ते तीन जिल्ह्यांचे पालकमंत्री आहेत. त्यांच्या कामाचा आवाकाच असा की रात्रीपर्यंत काम निपटल्याशिवाय घरी जात नाहीत. माणसाच्या डोक्यावरून केस तरी जातील एवढं ते पाठपुरवठा करतात, अशा शब्दांत फडणवीसांनी बावनकुळेंचं कौतुक केलं.

चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्त्वात भाजपा मोठी झेप घेईल

अनेक प्रदेशाध्यक्ष विदर्भ, नागपूरने दिले. आज जी पक्षाची झेप आहे, त्यात आतापर्यंतच्या सर्व प्रदेशाध्यक्षांचे मोठे योगदान आहे. आज त्याच मालिकेत चंद्रशेखर बावनकुळे यांचा समावेश झाला आहे. अतिशय मेहनतीने, अभ्यासाने काम करणारे चंद्रशेखर बावनकुळे आहेत. तळागाळातील कार्यकर्ता पक्षातील प्रदेशाध्यक्षपदासारख्या सर्वोच्च पदावर पोहोचू शकतो, याचा आदर्श म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्त्वात निश्चितपणे भाजपा मोठी झेप घेईल.
अडीच वर्षांचा काळ वाया गेला आहे. आता उर्वरित अडीच वर्षांत 5 वर्षांचे काम करायचे आहे. शेतकर्‍यांना दुप्पट मदत करण्याचा निर्णय आता आपण घेतला आहे. इतरही विविध प्रकारची मदत देणार, असंही फडणवीस म्हणाले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -