देवेंद्र फडणवीसांची कोरोनावर मात, राज्यसभेसाठी मतदानाचा मार्ग मोकळा

फडणवीस कोरोनामुक्त झाल्यामुळे बैठकांना उपस्थित राहू शकता. एक दिवसापूर्वी कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आजपासूनच फडणवीस बैठकांना उपस्थित राहणार आहेत.

Devendra Fadnavis corona report negative
देवेंद्र फडणवीसांची कोरोनावर मात, राज्यसभेसाठी मतदानाचा मार्ग मोकळा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. यामुळे आता ते बैठकांना प्रत्यक्ष उपस्थित राहू शकणार आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे देवेंद्र फडणवीस राज्यसभा निवडणुकीच्या मतदानासाठी उपस्थित राहणार का? असा प्रश्न उपस्थित झाला होता. परंतु मतदानाच्या एक दिवसापूर्वीच देवेंद्र फडणवीस कोरोनामुक्त झाले आहेत. आजपासून (सोमवार) फडणवीस पक्षाच्या बैठकांना उपस्थित राहणार आहेत. फडणवीसांची कोरोनाची सौम्य लक्षण आढळल्यानंतर कोरोना चाचणी केली होती.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली होती. लातूर-सोलापूर दौऱ्यावर असताना फडणवीसांची तब्येत बिघडली होती. यामुळे त्यांनी दौरा अर्धवट सोडला होता. मुंबईत आल्यावर कोरोना चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला होता. दुसऱ्यांदा कोरोनाची लागण फडणवीसांना झाली आहे. दरम्यान कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती फडणवीस यांनी स्वतः दिली होती. पाचव्या दिवशी फडणवीसांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे. घरीच फडणवीस कोरोनावर उपचार घेत होते.

फडणवीस कोरोनामुक्त झाल्यामुळे बैठकांना उपस्थित राहू शकता. एक दिवसापूर्वी कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आजपासूनच फडणवीस बैठकांना उपस्थित राहणार आहेत. तसेच राज्यसभेसाठी १० जून रोजी मतदान होणार आहे. या मतदानालासुद्धा फडणवीस उपस्थित राहतील. फडणवीस पुन्हा सक्रिय झाल्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. विधान परिषदेच्या जागांसाठी भाजपकडून उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. तर राज्यसभेसाठी भाजपकडून तीन उमेदवार देण्यात आले आहेत. या उमेदवारांना विजयी करण्याची जबाबदारी केंद्राने फडणवीसांना दिली आहे. यामुळे फडणवीसांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामध्ये ते आता कोरोनामुक्त झाल्यामुळे पुन्हा राजकारणात घडामोडी वेगवान होण्याची चिन्हे आहेत.


हेही वाचा : पंकजाताईंना उमेदवारी डावलल्यानं माझ्या मनाला वेदना, एकनाथ खडसे भावूक