घरमहाराष्ट्र...तर तुमच्या सत्तेचा ढाचा खाली पाडणार, देवेंद्र फडणवीसांचा पलटवार

…तर तुमच्या सत्तेचा ढाचा खाली पाडणार, देवेंद्र फडणवीसांचा पलटवार

Subscribe

आम्ही फाईव्ह स्टारचं राजकारण केलं नाही, जमिनीवरचं राजकारण केलं आहे. जेव्हा जेव्हा गेलो तेव्हा कधी तिकीट काढलं नाही. झोपलो तर फुटपाठ आणि मंदिरांवर, सोन्याचा चमचा घेऊन पैदा झालेलो नाहीये. कार सेवकांची चेष्टा करणाऱ्यांना सांगतो आम्ही पुन्हा तिकडे जाऊ, असंही देवेंद्र फडणवीस म्हणालेत. देवेंद्र फडणवीस बदायूच्या जेलमध्ये होते.

मुंबईः माझ्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही माझे वजन कमी करू शकणार नाही. मात्र हाच देवेंद्र फडणवीस तुमच्या सत्तेचा ढाचा पाडणार असल्याचाही निर्धारही देवेंद्र फडणवीसांनी बोलून दाखवला. मुंबईत देवेंद्र फडणवीसांनी आज हिंदी भाषिक महासंकल्प सभा घेतली, त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार पलटवार केला.

उद्धवजी म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी पाय ठेवला असता तरी बाबरी ढाचा खाली आला असता, आज माझे वजन 102 किलो आहे. बाबरी पाडायला गेलो तेव्हा माझे वजन 128 किलो होते. उद्धव ठाकरे यांच्या भाषेत सांगायचं झालं तर, सामान्य माणसाचा एफएसआय जर एक असेल, तर माझं एफएसआय 1.5 आहे आणि बाबरी पडायला गेलो तेव्हा माझं एफएसआय 2.5 होता. माझ्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही माझे वजन कमी करू शकणार नाही. मात्र हाच देवेंद्र फडणवीस तुमच्या सत्तेचा ढाचा पाडणार असल्याचाही निर्धारही देवेंद्र फडणवीसांनी बोलून दाखवला. आता तुम्ही म्हणता आम्ही लाथ मारली. हो, लाथ गधाच मारतो. खरा पहेलवान ठोकर मारतो, असंही त्यांनी सांगितलंय.

- Advertisement -

आम्ही फाईव्ह स्टारचं राजकारण केलं नाही, जमिनीवरचं राजकारण केलं आहे. जेव्हा जेव्हा गेलो तेव्हा कधी तिकीट काढलं नाही. झोपलो तर फुटपाठ आणि मंदिरांवर, सोन्याचा चमचा घेऊन पैदा झालेलो नाहीये. कार सेवकांची चेष्टा करणाऱ्यांना सांगतो आम्ही पुन्हा तिकडे जाऊ, असंही देवेंद्र फडणवीस म्हणालेत.  देवेंद्र फडणवीस बदायूच्या जेलमध्ये होते. आम्ही पोहोचले पण कोणीतरी शिवसेनेवाला पोहोचेल, पण कोणीच आले नाही. मी जेव्हा म्हणालो अयोध्येच्या रामजन्मभूमीत तुमचा एकही नेता नव्हता. मी गेलो होतो बाबरी पाडण्याकरिता याचा मला अभिमान आहे. 1992 साली फेब्रुवारी मी नगरसेवक झालो, जुलैमध्ये वकील झालो आणि डिसेंबरला नगरसेवक वकील देवेंद्र फडणवीस बाबरी पडण्यासाठी गेलो होतो, याचा मला अभिमान आहे. लाठी गोली खाएंगे मंदिर वही बनाऐंगे हे सांगत गेलो होतो. तुम्ही गेला होतात सहलीला आम्ही नाही गेलो, असाही देवेंद्र फडणवीसांनी पलटवार केलाय.

सकाळचा शपथविधी यशस्वी झाला असता, तर माझ्या मंत्रिमंडळातील कुण्या अनिल देशुमख किंवा नवाब मलिकची हिंमत झाली नसती. आणि ज्या दिवशी दाऊदच्या सहकार्‍यासोबत बसायची वेळ आली असती, त्यादिवशी सत्तेला ठोकर मारून घरी बसलो असतो. अरे कोणाच्या बापाची औकात आहे, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची. तुम्हाला इतिहास माहिती नाही. भारताच्या स्वातंत्र्यसैनिकांच्या रेकॉर्डमध्ये प.पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवारजी हे नाव आहे. जंगल सत्याग्रहात त्यांनी शिक्षासुद्धा भोगली. इतिहास पाहायचा नाही आणि मग बोलायचं. होय, मुंबई आम्हाला वेगळी करायची आहे, भ्रष्टाचार, अनाचारापासून वेगळी करायची आहे. काही लोक म्हणतात की मुंबई आमच्या बापाची आहे. मुंबई पूर्वी होती, मुंबई नंतर येईल, अनौरस मुलांचे ऐकले होते, अनौरसचे वडील पहिल्यांदाच ऐकत आहेत. मी पुन्हा पुन्हा सांगेन. महाराष्ट्र असो की मुंबई. बाप एकच आहे आणि तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, असंही त्यांनी सांगितलं.

- Advertisement -

सामान्य मुंबईकराचा पैसा तुम्ही जो लुटला, काहीच सोडलं नाही. ते भाषण जसं शिवसैनिकाकरिता होते, तसं ते सोनियाजींकरिताही होते. आता औरंगाबादचं नाव बदलायची आवश्यकता नाही. मला जर असं वाटतं ओ खैरे व्हा आता भैरे, औरंगाबादचा झाला कसरा, भाजपचं सरकार येत नाही तोपर्यंत संभाजीनगर विसरा. कारण मुख्यमंत्री कालच म्हणाले, आता आम्ही म्हणतो तर नाव बदलण्याची गरज काय? त्यांनी पाठिंबा काढू नका म्हणून सोनियांना आश्र्वस्त केले. ते भाषण शिवसैनिकासाठी नाही, सोनियाजींना खुश करण्यासाठी होतं. मॅडम आम्ही संभाजीनगर करत नाही, औरंगाबादच ठेवतो, असंही उद्धव ठाकरेंनी सोनिया गांधींना सांगितल्याचंही देवेंद्र फडणवीसांनी अधोरेखित केलंय. तुम्ही म्हणजे मुंबई, मराठी आणि हिंदुत्व नसल्याचंही ते म्हणालेत.

बरं झालं उद्धवजी तुम्हीच सांगितले, बाळासाहेब भोळे होते. वाघ भोळाच असतो. पण, धूर्त असतो तो लांडगा. तुम्हीच स्वत:ला धूर्त म्हटले, मी नाही! आणि तसेही आता या देशात एकच वाघ आहे आणि त्या वाघाचे नाव आहे, आमचे नेते मा. नरेंद्र मोदीजी. राज्य चालवणं तुम्हाला आयपीएलसारखे वाटतं. त्याने तुमचे मनोरंजन होते. पण, त्या नांदेडमधील आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांचे काय, असा सवालही देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केलाय.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -