Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी मंत्री झाले राजे अन् प्रत्येक विभागात वाझे; ठाकरे सरकारवर फडणवीस बरसले

मंत्री झाले राजे अन् प्रत्येक विभागात वाझे; ठाकरे सरकारवर फडणवीस बरसले

महाराष्ट्रात जे सुरु आहे त्याला सरकार म्हणता येईल का? असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला.

Related Story

- Advertisement -

पोलीस विभागातील वाझे तर सापडला, पण अन्य विभागातील वाझेचा पत्ता आम्हाला लागला आहे. यामुळेच पावसाळी अधिवेशन दोन दिवसाचं करण्याचा निर्णय या सरकारने घेतला असा घणाघात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी केला. ‘मंत्री झाले आपल्या विभागाचे राजे आणि प्रत्येक विभागात एक-एक वाझे’ अशा शब्दात फडणवीस ठाकरे सरकारवर बरसले. महाराष्ट्रात जे सुरु आहे त्याला सरकार म्हणता येईल का? असा सवालही त्यांनी केला. भाजपच्या कार्यकारिणी आज बैठक पार पडली. यावेळी बोलताना फडणवीस यांनी कोरोना, शेतकरी, मराठा, ओबीसी आरक्षण, भ्रष्टाचार अशा अनेक मुद्द्यांवरुन महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली.

प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतो

राज्याच्या इतिहासात हे महाविकास आघाडीचं सरकार भ्रष्टाचार, अनाचार, दुराचार, अत्याचाराने बरबटलेलं सरकार आहे. अशी अवस्था गेल्या ६० वर्षात पाहिली नाही. राज्यात सरकार म्हणून अस्तित्व कुठं आहे? मंत्री झाले आपल्या विभागाचे राजे आणि प्रत्येक विभागात एक एक वाझे, ही अवस्था महाराष्ट्राची पाहायला मिळतेय. कुठल्याही सरकारमध्ये एक मुख्यमंत्री असतो, पण या सरकारमध्ये प्रत्येक मंत्री मुख्यमंत्री समजतो, एक निर्णय घेतला जातो, तो तासाभरात रद्द होतो, मग दुसऱ्यादिवशी पुन्हा निर्णय घेतला जातो, सरकार आहे की सर्कस आहे? असा खोचक सवालही फडणवीसांनी विचारला.

अधिवेशनापासून सरकार पळ काढतंय

- Advertisement -

मुंबईच्या बाहेर महाराष्ट्र आहे का? नागपूर, औरंगाबाद, नाशिक, पुणे महाराष्ट्रात आहे का? मग कुठे आहे सरकार? नाशिक, नागपूर, औरंगाबादमध्ये एक कोविड सेंटर या सरकारनं काढलं का दाखवा? कोरोना काळात प्रत्येक खरेदीमध्ये भ्रष्टाचार पाहायला मिळाल्याचा गंभीर आरोपही फडणवीसांनी केलाय. राज्यात फक्त वसुली सरकार, १०० कोटी रूपयांच्या वसुली, पोलिसातला वाझे सापडला, अजून वेगवेगळ्या विभागातले वाझे आहेत, त्यांचे पत्ते आम्हाला सापडले आहेत, आमच्याकडे त्यांचे पत्ते आलेत, त्यामुळे अधिवेशन गुंडाळलं. अधिवेशनापासून हे सरकार पळ काढतंय कारण असं केलं तर आपला भ्रष्टाचार बाहेर येईल, असा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला.

- Advertisement -