Monday, April 12, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांचं कालचं भाषण कशासाठी होतं हेच समजलं नाही; फडणवीसांचा टोला

मुख्यमंत्र्यांचं कालचं भाषण कशासाठी होतं हेच समजलं नाही; फडणवीसांचा टोला

Related Story

- Advertisement -

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री लाीव्ह येत जनतेला संबोधित केलं. कोरोनच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. मुखअयमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात राज्यातील जनतेला संपूर्ण लॉकडाऊनचा इशारा दिला. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या भाषणावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. कालचं भाषण कशासाठी होतं हेच समजलं नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली.

“कालचं भाषण कशासाठी होतं हेच समजलं नाही. काय उपाययोजना करणार हे सांगितलं नाही. लॉकडाऊन हे अपवादात्मक परिस्थितीत करावं लागतं. पण तो अपवाद आहे, नियम नाही. लॉकडाऊन करायचा असेल तर प्रत्येकाचा विचार करावा लागेल,” असं फडणवीस यांनी म्हटलं. ते नागपूरात माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी पूर्ण कोव्हिडमध्ये एक राज्य आपल्या लोकांना त्रास देत असेल तर ते महाराष्ट्र आहे, असं म्हणत राज्य सरकारवर टीका केली.

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांनी कालच्या भाषणात रुग्णसंख्या का वाढत आहे? महाराष्ट्रातच का वाढत आहे? काय उपाययोजना करत आहोत हे सांगण्याची आवश्यकता होती. नागपूरसारख्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढल्यानंतर सरकार काय व्यवस्था करणार आहे? पुण्याला काय करणार आहे? किंवा राज्यातील इतर भागात संख्या वाढत असताना बेड मिळत नाही, व्यवस्था नाही याचं उत्तर त्यांनी त्यांच्या भाषणात द्यायला हवं होतं. पण मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना उत्तर दे, टोलेबाजी कर, सल्ला देणाऱ्यांना उत्तर दे यातच वेळ घालवला,” अशी टीका फडणवीस यांनी केली.

यावेळी फडणवीस यांनी आव्हाड यांना देखील उत्तर दिलं. जितेंद्र आव्हाड यांना विस्मरणाचा रोग झाला आहे. याचं कारण महाराष्ट्रातील एकमेव सरकार आहे ज्यांनी कोणतीही मदत केलेली नाही. केंद्र सरकारने २० लाख कोटींचं पॅकेज गेल्या वर्षभरात दिलं आहे. देशातील इतर राज्यांनीही पॅकेज दिलं आहे. फक्त महाराष्ट्राने एक पैशांचं पॅकेज तर दिलंच नाही पण त्याऐवजी लोकांचं वीज कनेक्शन कापणं, लोकांना त्रास देणं यावरच भर दिला आहे, असं उत्तर जितेंद्र आव्हाड यांना देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.


- Advertisement -

हेही वाचा – ‘टीका करणं सोपं, उद्धव ठाकरे होणं अवघड’; आव्हाडांचं फडणवीसांना प्रत्युत्तर


 

- Advertisement -