घरताज्या घडामोडी'सिलेक्टिव्ह मेमरी’वर औषध नसतेच, जीएसटी भरपाईची माहिती देत फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

‘सिलेक्टिव्ह मेमरी’वर औषध नसतेच, जीएसटी भरपाईची माहिती देत फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

Subscribe

पेट्रोल-डिझेलच्या दरावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्य सरकारवर आरोप केले. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सडेतोड उत्तर दिलं. देशाच्या विकासात महाराष्ट्राचे सर्वात मोठे योगदान पण केंद्राकडून आर्थिक बाबतीत सापत्नभावाची वागणूक दिली जात असल्याची तिव्र प्रतिक्रिया दिली. तसेच, राज्याला सुमारे २६ हजार ५०० कोटी रुपये जीएसटी थकबाकीपोटी मिळणे बाकी आहे, असे म्हटले. यावर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत केंद्रातील मोदी सरकारने युपीए सरकारपेक्षा जास्त दिले असल्याचा दावा केला आहे. “मुख्यमंत्री महोदय, ज्यांच्यासोबत तुम्ही सध्या सत्तेत आहात, त्यांच्या संपुआ सरकारने महाराष्ट्राला जे दिले, त्यापेक्षा कितीतरी अधिक नरेंद्र मोदीजी यांच्या सरकारने महाराष्ट्राला दिले आहे. त्यामुळे ‘सिलेक्टिव्ह मेमरी’वर तसेही औषध नसतेच,” असे म्हटले.

- Advertisement -

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार महाराष्ट्राला पै न् पै देईलच, कारण हे पैसे जुलैपर्यंत द्यायचे असतात. कोरोना काळात केंद्रालाही जीएसटी आला नाही, तेव्हा केंद्राने कर्ज घेऊन राज्यांना पैसे दिले आणि हेही सांगितले की राज्यांना संपूर्ण पैसा दिला जाईल. माझी पुन्हा विनंती आहे, विषय भरकटवू नका. विषय पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याचा आहे,” असे देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -