घरमहाराष्ट्र सावकारासारख्या वसुलीसाठी हे नाटक, देवेंद्र फडणवीस यांची आघाडी सरकारवर टीका

 सावकारासारख्या वसुलीसाठी हे नाटक, देवेंद्र फडणवीस यांची आघाडी सरकारवर टीका

Subscribe

एकीकडे कोरोनामुळे शेतकरी असो की सामान्य नागरिक असो तो अडचणीत आहे आणि तो अडचणीत असताना त्यांना मदत करण्याऐवजी, त्याच्याकडून जबरदस्ती वसुली या सरकारला करायची आहे. सावकारासारखी वसुली करायची आहे. म्हणून हे सगळे नाटक सुरू आहे. अशी टीका महाविकासआघाडी सरकारवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना केली. वीज बिल थकबाकीची वेळेवर वसुली झाली नाही तर राज्य अंधारात जाऊ शकते, असे राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटले आहे, या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी हा निशाणा साधला आहे.

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी जे सांगितले त्यातूनच हे लक्षात येते की, त्यांच्या काळात किती थकबाकी वाढली. पण ही जी काही थकबाकी आपण दाखवतो, याच्यामध्ये विशेषता कृषी पंपाच्या संदर्भात आपण क्रॉस सबसिडी करतो. त्यानंतर जो काही आपला तोटा आहे, हा भरून काढण्यासाठी आपल्याला जे टेरिफ मिळते, त्यामधून हा तोटा आपण भरून काढतो. त्यामुळे मला असे वाटते की, या ठिकाणी जबरदस्ती वसुली करण्यासाठी हा सगळा बाऊ तयार करण्यात येतोय, असेही फडणवीसांनी यावेळी बोलून दाखवले.

- Advertisement -

याचबरोबर नुकतीच पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना फडणवीस म्हणाले की, आता निवडणुका लागल्या आहेत, तर त्याला आम्ही सामोरे जाऊ, पण एकप्रकारे सरकार जे बोलते ते सरकारच्या कृतीत मात्र कुठे दिसत नाही हे यातून स्पष्ट झालेले आहे. नाना पटोले जे बोलले आहेत, त्याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले पाहिजे. कारण, मुख्यमंत्र्यांनी कुंभकोणी यांना नियुक्त केले आहे. या सरकारने त्यांना पुन्हा नव्याने नियुक्त केले आणि त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली. असेही यावेळी फडणवीस म्हणाले.

आमचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, ते बोली भाषेत बोललेले आहेत आणि त्यामुळे त्याचे वेगवेगळे अर्थ काढले जाणे हे योग्य नाही. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे काही मुद्दे नाहीत. त्यामुळे असे मुद्दे घेऊन ते काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा टोला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -