घरमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं पॅकेज ही निव्वळ धूळफेक - फडणवीस

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं पॅकेज ही निव्वळ धूळफेक – फडणवीस

Subscribe

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ब्रेक दी चैन नुसार १५ दिवस लॉकडाऊन करण्यात आलं आहे. मंगळवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाईव्ह येत घोषणा केली. यावेळी त्यांनी आर्थिक पॅकेज देखील जाहीर केलं. या पॅकेजवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं पॅकेज ही निव्वळ धूळफेक आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध लावणार असेल तर विविध घटकांना सरकारने मदत केली पाहिजे. पण सरकारने जाहीर केलेलं ५ हजार ३०० कोटीचं पॅकेज निव्वळ धूळफेक आहे. ३ हजार ३०० कोटींची तरतुद कोरोनाच्या संदर्भात जी सांगण्यात आली ती नियमित अर्थसंकल्पातील सांगण्यात आली आहे. ती वर्षभरात खर्च होणार आहे. त्यामुळे आता वाढणाऱ्या कोरोनासाठी ३ हजार ३०० कोटी नाहीत. सरकारकडून अपेक्षा होती की कीती बेड्स वाढवणार? किती व्हेंटीलेटर्स वाढवणार? त्याला किती वेळ लागणार? याची माहिती देणे अपेक्षित होतं, मात्र तसं काहीच सांगण्यात आलं नाही, असं फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

अनेक घटकांना सरकारने मदत केली नाही. शेतकरी, शेतमजूर, बारा बलूतेदार, केशकर्तनालय, फूलवाल, छोटे उद्योगवाले…कोणाला कुठलीच मदत नाही. यात दिशाभूल करण्यात आली. ज्या योजना या सरकारने सांगितल्या, त्या केंद्राच्या योजना आहेत. आम्हाला वाटलं सरकार अधिकचे १ हजार रुपये देतंय. परंतु तसं नाही आहे. या योजनांमधून जे हजार-बाराशे रुपये मिळतात ते आगाऊ देत आहे म्हणजे एकही पैसे नविन मिळत नाही आहेत, असं फडणवीस म्हणाले.

आदीवासींच्या संदर्भात २ हजार रुपये खावटी अनुदान हे देखील अक्षरश: त्यांच्या तोंडाला पानं पुसणं आहे. कारण मागच्या वर्षीचे चार हजार रुपयाचं खावटी अनुदान थेट द्या हे वित्त सचिवांनी सांगितलं होतं. परंतु जे मंत्रालय आहे, त्यांना खरेदी करायची होतं, त्यामुळे त्यांनी दिलं नाही. मागच्या वर्षीचं ४ हजारचं अनुदान मिळालं नाही, आणि आत २ हजारच मिळणार आहेत. म्हणून पुन्हा एकदा आदीवासींच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या सरकारने केलं आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -