घरमहाराष्ट्रसावरकरांच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीसांची विरोधकांवर टीका; म्हणाले.. "ते रोज..."

सावरकरांच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीसांची विरोधकांवर टीका; म्हणाले.. “ते रोज…”

Subscribe

रविवारी मालेगाव येथे झालेल्या जाहीर सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी सावरकरांच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांची कानउघडणी केली. पण याच मुद्द्यावरून आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली आहे.

रविवारी ठाकरे गटाची नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे जाहीर सभा पार पडली. या सभेमधून उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर तर निशाणा साधलाच. पण स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरून त्यांनी राहुल गांधी यांची सुद्धा कानउघडणी केली. पण ही दुटप्पी घेणे बंद करा, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली आहे. माझ्यासोबत चालत आल्यामुळे असं काही घडत असेल तर.. असं म्हणत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला. सावरकरांच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषद बोलवली होती. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “माझ्यासोबत चालत आल्यामुळे असं काही घडत असेल तर मी रोज काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेनेच्या एकेका नेत्याला दरवाजापासून ते विधान भवनापर्यंत चालत नेईन. म्हणजे ते सगळे सावरकर की जय म्हणतील,”

- Advertisement -

तर पुढे बोलताना ते म्हणाले की, “सत्तेला लाथ मारायची हिंमत त्यांच्यामध्ये नाही. त्यामुळे केवळ भाषणांमध्ये सावरकर जीवंत राहतील, कृतीमध्ये सावकरक दिसणार नाहीत. शिवसेना आणि भाजप प्रत्येक जिल्ह्यात राहुल गांधींचा निषेध करत सावरकर गौरव यात्रा काढेल आणि याच्या माध्यमातून आम्ही सावरकरांचे कार्य जनतेसमोर आणू आणि त्यांचा गौरव करू.”

दरम्यान, सावरकर यांच्याबाबत राहुल गांधी यांनी वक्तव्ये केले होते. ज्याबाबत माफी मागणार नसल्याचे देखील राहुल गांधी यांनी जाहीरपणे सांगितले होते. राहुल गांधींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हे आम्ही सहन करणार नाही, असे म्हणत राहुल गांधी यांचा निषेध केला. पण यांमुळे सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची भूमिका दुटप्पी असल्याची सांगत त्यांच्यावर टीका करण्यास सुरूवात केली.

- Advertisement -

महत्वाची बाब अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली होती. यानंतर त्यांच्यामध्ये बऱ्याचवेळ हसत गप्पागोष्टी देखील झाल्या. ज्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा झाल्या. पण त्या चालत्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांची भूमिका बदलली, असे अप्रत्यक्षपणे बोलत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला.


हेही वाचा – सावरकरांनी ज्या तुरुंगात यातना भोगल्या त्या तुरुंगात राहुल गांधींनी एक दिवस जावे – मुख्यमंत्री शिंदे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -