घरताज्या घडामोडीमंदिरांपेक्षा जास्त गर्दी दारू दुकानांमध्ये, मग मंदिरे का बंद - फडणवीसांचा राज्य...

मंदिरांपेक्षा जास्त गर्दी दारू दुकानांमध्ये, मग मंदिरे का बंद – फडणवीसांचा राज्य सरकारला सवाल

Subscribe

राज्य सरकार शाळांबाबत गोंधळलेल्या अवस्थेत आहे.

मदिरांपेक्षा जास्त गर्दी दारु दुकानांमध्ये असते तर मग मंदिरे बंद का असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला केला आहे. राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ब्रेक द चेन अंतर्गत कोरोना निर्बंध लागू करण्यात आले होते मात्र आता निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. दारुची दुकाने, हॉटेल सर्व सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतू मंदिर सुरु करण्यास परवानगी दिली नसल्यामुळे विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. सोशल डिस्टंन्सचे नियम पाळून मंदिर उघडण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पंढरपूर दौऱ्यावर होते. फडणवीस यांनी दौऱ्यादरम्यान माध्यमांशी संवाद साधताना राज्य सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे. राज्यातील दारुची दुकाने सुरु केली मात्र मंदिरे सुरु बंद ठेवली आहेत. जेवढी गर्दी बारमध्ये होते त्यापेक्षा कमी गर्दी मंदिरात होते असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. तसेच फडणवीस यांनी म्हटलं आहे की, आम्हा हिंदूंचे ३३ कोटी देव आहेत, आम्हाला कुठेही देव भेटतो. अनेक गरीब लोकांची उपजीविका मंदिरावर अवलंबून आहे. हारवाला ते मंदिरातले पुजारी असे असंख्य लोकं मंदिरावर अवलंबून असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मंदिरांवर अवलंबून असलेल्या लोकांसाठी मंदिरे उघडा, मंदिर बंद ठेवणे ही सरकारची चूक असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

शाळांबाबत एक निश्चित धोरण करा

राज्य सरकार शाळांबाबत गोंधळलेल्या अवस्थेत आहे. राज्य सरकारच्या गोंधळामुळे पालक आणि विद्यार्थी संभ्रमावस्थेत आहेत. शाळेबाबत एक निर्णयावर पळ न काढता एकच धोरण निश्चित केलं पाहिजे. यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमधील संभ्रम दूर होईल असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

कोरोना निर्बंधांत सूट

राज्यातील कोरोना निर्बंधांत मोठ्या प्रमाणात सूट देण्यात आली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल्स आणि दुकानांना रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे. तसेच लग्न कार्यासाठी आसक्षमतेच्या ५० टक्क्यांची उपस्थितीची परवानगी दिली आहे. सिनेमागृह आणि नाट्यगृह आणि धार्मिक स्थळ पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. शॉपिंग मॉल रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. दोन डोस घेतलेल्या नागरिकांना मॉलमध्ये प्रवेशाची परवानगी दिली आहे. तसेच १८ वर्षांखालील मुलांना ओळखपत्र दाखवणे अनिवार्य असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : ओबीसींना फसवण्याचं काम ठाकरे सरकार करतंय; फडणवीसांचा घणाघात


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -