Thursday, July 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी कोकणातील स्थिती भीषण, संकटात असलेल्यांना तात्काळ मदत करण्याची फडणवीस यांची मागणी

कोकणातील स्थिती भीषण, संकटात असलेल्यांना तात्काळ मदत करण्याची फडणवीस यांची मागणी

मागील २ वेळेसची मदत कोकणातील नुकसानग्रस्तांना मिळाली नाही परंतु आता तात्काळ मदत करण्याची गरज - देवेंद्र फडणवीस

Related Story

- Advertisement -

कोकणात मुसळधार पावसामुळे अत्यंत भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. कोकणातील काही भागात मोठ्या प्रमाणात पाणी गावे, वस्त्यांमध्ये शिरले असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोकणातील नागरीकांना तात्काळ मदत करण्याची विनंती राज्य सरकारकडे केली आहे. मागील एक वर्षात कोकणवासीयांना तिसऱ्यांदा संकटाचा सामना करावा लागत असल्यामुळे नागरिकांना आता तात्काळ मदत करण्याची गरज असल्याचे फडणवीस यांनी म्हटलं आहे. फडणवीस यांनी स्वप्नील लोणकरच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना कर्जमुक्त करण्यास मदत केली आहे.

कोकणातील परिस्थिती भीषण आहे. साधारणपणे कोकणवासीयांना वर्षभरात तिसरा फटको बसला आहे. मागील २ वेळेसची मदत कोकणातील नुकसानग्रस्तांना मिळाली नाही परंतु आता तात्काळ मदत करण्याची गरज आहे. यामुळे राज्य सरकारने नागरीकांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मदत करण्यासाठी जेवढ्या मदत पथकांची गरज असेल उपाययोजना करण्याची गरज असेल त्या उपययोजना कराव्यात अशी विनंती असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

स्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत

- Advertisement -

एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थी स्वप्नील लोणकरने आत्महत्या केल्यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर लोणकर यांच्या कुटुंबीयांना भेटायला गेले होते. एकूणच त्यांच्या घरची काळजी घेतली जात आहे. कुटुंबीयांवर कर्ज असल्यामुळे ते कर्ज फेडण्याचा प्रवीण दरेकर यांनी विचार केला आणि गोपीचंद पडळकर, प्रवीण दरेकर यांच्यासह भाजप नेत्यांनी जवळपास साडे एकोणीस लाखांचा चेक देऊन कर्जमुक्त करण्यास मदत केली आहे. भविष्यात दुसरा स्वप्नील लोणक होऊ नये यासाठी भाजप प्रयत्न करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्री ठाकरेंनी घेतला पूरपरिस्थितीचा आढावा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरपरिस्थितीचा आढावा घेतला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्गचे जिल्हाधिकारी, कोकण विभाग आयुक्त, रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री अनिल परब, सिंधुदूर्ग जिल्हा पालकमंत्री उदय सामंत आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आदीती तटकरे यांच्याशी चर्चा करुन तात्काळ आपत्कालीन विभागाकडून मदत पोहचवण्याचे आदेश दिले आहेत. पुराने वेढलेल्या गावांना शहरांतील नागरिकांना ताततडीने मदत पुरवण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

- Advertisement -