आता तरी इंधनाचे दर कमी करा, देवेंद्र फडणवीस यांची राज्य सरकारकडे मागणी

Leaders meet at Devendra Fadnavis's house
सत्तांतरापूर्वीच देवेंद्र फडणवीसांवर शुभेच्छांचा वर्षाव, नेतेमंडळींचा फडणवीसांच्या घरी राबता

वस्तू आणि सेवाकराची (जीएसटी) थकबाकी केंद्र सरकारने राज्यांना वितरित केली आहे. त्यामुळे आता तरी राज्य सरकारने इंधनाचे दर कमी करावेत, अशी मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली.

ते म्हणाले की, ३१ मे २०२२पर्यंतचा जीएसटी, जानेवारीपर्यंतच्या कम्पेन्सेशनसह संपूर्ण रक्कम केंद्र सरकारने काल सर्व राज्यांना दिली. यात महाराष्ट्राला सर्वाधिक १४,१४५ कोटी मिळाले. आता तरी पेट्रोल-डिझेलचे दर महाराष्ट्रात कमी करणार की पुन्हा शिल्लक दाखवून केंद्रावर खापर फोडत धन्यता मानणार? राज्य सरकार म्हणून कर्तबगारी दाखविण्याची वेळ जेव्हा जेव्हा महाविकास आघाडीवर आली, तेव्हा प्रशासनाची ढकलगाडी करण्यातच त्यांनी धन्यता मानली. केंद्रावर दोषारोप हाच पुरुषार्थ समजण्याची चूक आणखी किती काळ करणार, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला केला.

केंद्राकडे जीएसटीचे अजूनही १५ हजार कोटी रुपये थकीत – अजित पवार
केंद्र सरकारच्या जीएसटी भरपाईच्या वाटपावरून राज्य सरकारने नाराजी व्यक्त केली. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, अजूनही केंद्र सरकारकडे महाराष्ट्राच्या जीएसटी भरपाईचे १५ हजार कोटी रुपये बाकी आहेत. आम्ही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आधीच कपात केली आहे. ते मागच्या काळात येणारे पैसे होते हे आपल्यालाही माहिती आहे. ते पैसे आता मिळाले आहेत, असे त्यांनी सांगितले.