घरताज्या घडामोडीआंबेघरमधील दरडग्रस्त नागरिकांचं पुनर्वसन करणं आवश्यक, फडणवीस यांची मागणी

आंबेघरमधील दरडग्रस्त नागरिकांचं पुनर्वसन करणं आवश्यक, फडणवीस यांची मागणी

Subscribe

मोरगिरीतील पूरग्रस्तांचे आणि आंबेघरमधील नागरिकांचे दरड कोसळल्यामुळे मोठं नुकसान

सातारा जिल्ह्यातील आंबेघरमध्ये दरड कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला आहे. या भागात आणखी काही घरे आहेत परंतू नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. या नागरिकांची भेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आंबेघर आणि मोरगिरीमधील पूरग्रस्तांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. तसेच आंबेघरच्या लोकांचं मोठं नुकसान झालं असून त्यांचे पुनर्वसन करणं आवश्यक असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. दौऱ्यादरम्यान फडणवीस यांनी नागरिकांसाठी सोय करण्यात आलेल्या गावातील शाळेत पूरग्रस्तांसोबत भोजनही केले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सातारा दौऱ्यावर आहेत. फडणवीस यांच्यासोबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरही आहेत. साताऱ्यातील पाटण तालुक्यातील आंबेघर येथील दरडग्रस्तांची तर मोरगिरीमधील पूरग्रस्तांची देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. आंबेघरमध्ये दरड कोसलळ्याच्या दुर्घटनेत एकूण १५ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आंबेघरमधील नागरिकांची राहण्याची सोय गावातील शाळेत करण्यात आली आहे. फडणवीस यांनी या शाळेत जाऊन नागरिकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केलं तसेच त्यांच्या सोबत भोजनाचाही आस्वाद घेतला आहे.

- Advertisement -

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी पूरग्रस्तांची भेट घेतल्यानंतर त्यांच्यासोबत खाली बसून जेवण केलं आहे. नागरिकांसाठी जेवणासाठी शाळेत सोय करण्यात आली आहे. या पूरग्रस्त नागरिकांसाठी केलेल्या जेवणाचा आस्वाद प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. यावेळी मोरगिरीतील पूरग्रस्तांचे आणि आंबेघरमधील नागरिकांचे दरड कोसळल्यामुळे मोठं नुकसान झालं आहे. यामुळे या नागरिकांचे पुनर्वसन करणं आवश्यक आहे. तसेच त्यांना भरीव मदत करणंही गरजेचे असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

दरड कोसळून १५ जणांचा मृत्यू

साताऱ्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ता खचणे, दरड कोसळण्यासारख्या दुर्घटना घडल्या आहेत. रायगडमधील तळीये गावात दरड कोसळ्याच्या दुर्घटनेनंतर आंबेघरमध्येही दरड कोसळून १५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. या घटनेत एकूण १५ लोकांचा मृत्यू झाला आहे. मध्यरात्री दरड कोसळी असल्याची माहिती स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. आंबेघरमध्ये अनेक घरे आहेत त्यापैकी काही घर मातीच्या ढिगाऱ्याखाली गेल्यामुळे १५ जणांचा मृत्यू झाला आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -