घरमहाराष्ट्रगृहमंत्र्यांनी राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावे, फडणवीसांची मागणी

गृहमंत्र्यांनी राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावे, फडणवीसांची मागणी

Subscribe

मुख्यमंत्री पदाचा मान राखून आणि घराण्याचा मान राखून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याबाबत तात्काळ कारवाई करायला हवी

परमबीर सिंह यांच्या आरोपांबाबत अॅडव्होकेट जयश्री पाटील यांच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी करण्यात आली. यावेळी हायकोर्टाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सीबीआयला चौकशीचे आदेश दिले आहेत. १५ दिवसात चौकशी करुन त्यातून जो अहवाल समोर येईल त्यानुसार पुढील कारवाई करण्याचे आदेश हायकोर्टाने दिला आहे. त्यामुळे एक प्रकारे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआय चौकशी लावली असल्याचे दिसते आहे. गृहमंत्र्यांनी पदाचा तात्काळ राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावे, चौकशीत निर्दोष आढळल्यावर पुन्हा पदभार स्विकारावा असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

हफ्ते वसूलीचे काम जे सरकारच्या आशिर्वादाने किंवा सरकारमधील काही मंत्र्यांच्या आशिर्वादाने होत होते. आज संदर्भात एक कडक पाऊल उच्च न्यायलायने उचलले आहे. उच्च न्यायालयाचे स्वागत करतो. महाराष्ट्राच्या इतिहासाला काळिमा फासण्याचे काम हे जे काही मधल्या काळात सुरु होते. आता निश्चित सत्य बाहेर येईल. सीबीआय चौकशीत हफ्ताखोरी चालली होती यागोष्टी बाहेर येतील. काही लोकांनी सीबीआय चौकशी होऊ नये यासाठी प्रयत्न केले तसेच रश्मी शुक्लांनी सादर केलेला अहवाल कशाप्रकारे चुकीचा होता हे भासवण्याचा प्रयत्न केला. त्याला जोरदार उत्तर उच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयाचे स्वागत करतो या निर्णयानंतर राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि ते देत नसतील तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तो राजीनामा घेतला पाहिजे असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

नैतिकतेच्या आधारावर एखाद्या मंत्र्यांच्या उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशी सांगितल्यानंतर आणि त्यातल्या त्यात गृहमंत्र्यांविरोधात अशी चौकशी सांगितल्यानंतर त्यांनी पदावर राहणे अयोग्य ठरेल त्यांनी राजीनामा द्यावे आणि चौकशीला समोरे जावे आणि चौकशीतून निर्दोष मुक्त झाल्यावर पुन्हा पदभार स्विकारावा त्याला कोणाचा विरोध नसेल. पण आता मात्र ही राजकीय पक्षांची मागणी नसून सीबीआय चौकशी आहे.

राष्ट्वादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे मोठे नेते आहेत. परंतु ते आता आजारी असून विश्रांती घेत आहेत. त्यांना कोणताही त्रास देण्याचा आमचा हेतू नाही. परंतु अशा प्रकरणात पक्षातील मोठ्या नेत्याची जबाबदारी असते त्यांनी नैतिकता पाळायला पाहिजे. आता कोर्टाने आदेश दिले असल्यामुले पवार साहेब काय निर्णय घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात घेतलेली भूमिका पदाला शोभणारी नाही. पहिले सचिन वाझेंची पाठराखण केली यानंतर त्यांनी एकदाही प्रतिक्रिया दिली नाही. एवढे सगळे होऊनही मुख्यमंत्र्यांनी एकही प्रतिक्रिया दिली नाही हे आश्चर्यजनक असल्याचे फडणवीसांनी म्हटले आहे. मुंख्यमंत्र्यांनी मौन बाळगणे हे आश्चर्यजनक आहे. मुख्यमंत्री पदाचा मान राखून आणि घराण्याचा मान राखून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याबाबत तात्काळ कारवाई करायला हवी असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -