राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करावी, देवेंद्र फडणवीस यांची मागणी

राज्य सरकारने स्वतःच्या नाकर्तेपणामुळे केंद्राकडे बोट दाखवू नये

devendra fadnavis slams thackeray government on relief to farmers
शेतकर्‍यांप्रति ‘नक्राश्रू’ ढाळणारे ‘महाविकास’ नेते आता बंद पुकारतील काय?

विरोधी पक्षनेते जळगाव दौऱ्यावर आहेत. जळगावमधील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी फडणवीस यांनी थेट शिवारात गेले होते. शेतकऱ्यांचं प्रंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. १०० टक्के केळीचे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत केली पाहिजे. शेतकऱ्यांची मागणी आहे की, विमा कंपन्यांनी सरसकट मदत केली पाहिजे. विमा कंपन्या कारण देऊन अडचणी निर्माण करत आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे तसेच ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला नाही त्यांनाही सरकारने विमा काढला आहे असे समजून ५० टक्के मदत केली पाहिजे अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

विम्याची रक्कम मिळताना अडचण होत आहे. विशेषता मागच्या काळात युतीचं सरकार असताना आमदार हरिभाऊ जावळे यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी तयार करण्यात आली होती. हरिभाऊ जावळे कमिटीने केळीच्या संदर्भात विम्याचे निकष ठरवले होते. या निषाणुसार टेंडर काढण्यात आले होते याचा चांगला फायदा शेतकऱ्यांना झाला होता. मात्र मागच्या वर्षी या कमिटीचे निकष बदलण्यात आले त्यानुसार टेंडर काढण्यात आला आहे. याचा जास्त फायदा विमा कंपन्यांना होत आहे. यामुळे हरिभाऊ जावळे यांच्या निकषानुसार केळीचा विमा उतरवला पाहिजे आणि शेतकऱ्यांना भरीव मदत केली पाहिजे असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता पुर्ण शेत साफ करुन नव्याने रोपणी करावी लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना राज्य सरकारने भरीव मदत करणे गरजेचे आहे. राज्य सरकारने स्वतःच्या नाकर्तेपणामुळे केंद्राकडे बोट दाखवू नये. मागील वर्षी राज्य सरकारने विम्याचे टेंडरच काढले नव्हते युतीचे सरकार असताना आम्ही वारंवार विम्याचे टेंडर काढत होतो. त्याचा पाठपुरावा करत होतो त्यामुळे राज्याला अधिक मदत केंद्र सरकारकडून मिळाली होती. दुसरे म्हणजे शेतकऱ्यांनी अशी मागणी केली आहे की, पुर्वी करप्यावर राज्य सरकारकडून औषध दिलं जात होतं परंतु ते आता राज्य सरकारने बंद केले आहे त्यामुळे करप्यावरील औषध राज्य सरकारने पुन्हा दिलं पाहिजे असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.