घरताज्या घडामोडीबैल कधी एकटा येत नाही तर तो नांगरा..., बैलगाडी शर्यतीवेळी देवेंद्र फडणवीसांनी...

बैल कधी एकटा येत नाही तर तो नांगरा…, बैलगाडी शर्यतीवेळी देवेंद्र फडणवीसांनी ऐकवला डायलॉग

Subscribe

बैलगाडा शर्यतीसाठी फडणवीसांना स्पेशल पोशाख

राज्यात एकीकडे आरोप प्रत्यारोप सुरु असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बैलगाडा शर्यतीला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी सुप्रसिद्ध मराठी चित्रपट मुळशी पॅटर्नमधील गाजलेला डायलॉग ऐकवला आहे. तसेच बैलगाडा शर्यतीला ज्यांचा विरोध होता त्यांचाही चांगला समाचार घेतला आहे. ‘बैल कधी एकटा येत नाही, सोबत नांगर घेऊन येतो’ असा डायलॉग फडणवीस यांनी ऐकवताच उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद दिला. दरम्यान तो नांगर बैलगाडा शर्यतीला विरोध करणाऱ्यांसाठी असल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पिंपरी चिंचवड शहरातील चिखलीमध्ये बैलगाडा शर्यतीला उपस्थिती लावली होती. फडणवीस म्हणाले की, मोठ्या उत्साहामध्ये दिसत आहेत. तुम्ही मुळशी पॅटर्न पाहिलाय का? बैल कधीच एकटा येत नाही जोडीने येतो आणि सोबत नांगर घेऊन येतो, नांगर कुणाकरिता, ज्याने बैलगाड्याला विरोध केला त्याच्यासाठी हा नांगर, महेश लांडगेंनी बैलगाडा शर्यत सुरु होण्यासाठी अपार कष्ट घेतले. अखेर ही शर्यत सुरु झाली. आज सोनियाचा दिवस आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

- Advertisement -

बैलगाडा शर्यतीसाठी फडणवीसांना स्पेशल पोशाख

दरम्यान आमदार महेश लांडगे यांनी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते. बैलगाडा शर्यत सुरु होण्यापूर्वी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली होती. परंतु चर्चा देवेंद्र फडणवीस यांच्या कपड्यांची झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नेहमी आपल्या कोट आणि पँट-शर्ट मध्ये दिसतात. परंतु आज त्यांनी वेगळा पोशाख घातला होता. यावरुन त्यांनी सांगितले की, महेश लांडगे यांनी हा पोषाख शिवला असून बैलगाडा शर्यतीसाठी हाच पोषाख घाला, असे त्यांनी सांगितले होते. जेव्हा बैलांचा उत्सव असतो तेव्हा बैलांना झूल चढवण्यात येते परंतु बैलगाडा शर्यतीमध्ये झूल चढवता येत नाही. त्यामुळे मला झूल घातली आणि बैलगाडा शर्यतीला आणलं असे फडणवीस म्हणाले आहेत.


हेही वाचा : रोहित पवारांच्या कामात अहिल्याबाईंच्या दृष्टिकोनाचा स्पर्श दिसतो – शरद पवार

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -