घरताज्या घडामोडी'सामना'त पंतप्रधानांचे कौतुक नाही का दिसले?

‘सामना’त पंतप्रधानांचे कौतुक नाही का दिसले?

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कौतुकाचे दाखले का नाही दाखवलात. ते तुम्हाला दिसले नाही का?, असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठारेंनी उपस्थित केला.

हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘सामना’च्या वृत्तपत्रातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेचे दाखले दाखवले यावर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. ‘झालात तुम्ही बेकार, म्हणून अजब वाटते आमचे सरकार’, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर बाण सोडत ‘सामना’त पंतप्रधानांचे कौतुक नाही का दिसले?, असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्र्यांचे फडणवीसांना उत्तर

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सामनाच्या वृत्तपत्रातून अनेक दाखले दाखवत मोठा गदारोळ केला. यामध्ये विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी ‘महाराष्ट्राचे खरे शत्रू हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आहेत. पवार हे तर गुंडाचे बादशह आहेत, तसेच महाराष्ट्रातील भष्ट्राचार पवारांनी केला. हे सर्व दाखले ‘सामना’च्या वृत्तपत्रातून दाखले दाखवले. यावर आज चोख प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी ‘आमच्या सामनातून आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही कौतुक केले आहे. ते तुम्हाला का दिसले नाही. त्याचे तुम्ही दाखले का दाखवले नाही’, असा सवाल उपस्थित केला. तसेच यावेळी त्यांनी ‘झालात तुम्ही बेकार, म्हणून अजब वाटते आमचे सरकार’, असे म्हणत भाजपवर घणाघात केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आज राज्यात ‘या’ ठिकाणी होणार आंदोलन


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -