घरताज्या घडामोडीतीन नंबरचा पक्ष पहिल्या अन् दुसऱ्या नंबरच्या पक्षाला फिरवतो, राज ठाकरेंच्या विधानावर...

तीन नंबरचा पक्ष पहिल्या अन् दुसऱ्या नंबरच्या पक्षाला फिरवतो, राज ठाकरेंच्या विधानावर फडणवीस म्हणतात…

Subscribe

राज ठाकरे जे बोलले ते सत्यच आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुका या शिवसेना – भाजप एकत्र लढले होते. राज्यातील जनतेने दोन्ही पक्षांनी भरभरून मतदान केले. पण बहुमतासह आमची सत्ता आली होती, पण ऐनवेळी शिवसेनेने आमच्या पाठीत खंबीर खुपसला. आम्हाला जनतेने बहुमत दिले होते. त्यामध्ये शिवसेनेच्याही जागा वाढल्या होत्या. पण शिवसेनेने पाठीतं खंजीर खुपसल्यानेच राज्यात तीन पक्षांचे सरकार महाराष्ट्रात आले, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या गुढी पाडवा मेळाव्यातील वक्तव्याचे समर्थन केले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सत्ता स्थापनेच्या निमित्ताने तिन्ही पक्षांवर टीका केली होती.

माजी राज्यमंत्री गंगाधर देशमुख कुंटुरकर यांच्या प्रेरणास्थळ या स्मारकाचे लोकार्पण हे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज ठाकरेंच्या वक्तव्याबाबत फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता. गुढी पाडवा मेळाव्यात सत्ता स्थापनेच्या निमित्ताने तिन्ही पक्षांवर राज ठाकरे यांनी टीका केली होती. जनतेने दिलेल्या बहुमताचा अनादर कपटनितीने करत शिवसेनेने कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत युती केली. या निवडणुकीत भाजप मोठा पक्ष ठरला होता. राज ठाकरेंनीही आपल्या भाषणात याच मुद्द्यावर टीका केल्याचेही फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

निवडणुकीच्या निकालात एक नंबरचा असलेला भारतीय जनता पक्ष सत्तेत येतच नाही. पण त्याचवेळी तीन नंबरचा पक्ष हा पहिल्या आणि दुसऱ्या नंबरच्या पक्षाला फिरवतो अशी स्थिती असल्याची टीका राज ठाकरेंनी केली होती. पळून कोणाबरोबर गेली आणि लग्न कोणाबरोबर केले काहीच कळेना. एक दिवस आम्ही पहाटे उठून पाहतो तर जोडा वेगळाच. महाराष्ट्राच्या राजकारणात अशी गोष्ट कधीच पाहिली नाही. ज्या मतदारांनी तुम्हाला मतदान केलं, त्यांनी तुम्हाला शरद पवार आणि कॉंग्रेससोबत जाण्यासाठी मतदान केलं नव्हत. मतदारांशी गद्दारी करणाऱ्यांना तुम्ही काय शिक्षा देणार ? असाही सवाल त्यांनी केला.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -