कोणताही संघटनात्मक बदल होणार नाही, दिल्लीतील बैठकीनंतर फडणवीसांचे स्पष्टीकरण

संघटनात्मकतेची पुढची वाटचाल...

amravati violence devendra fadnavis claims maharashtra riots is planned and appeal for peace

दिल्लीतील भाजप मुख्यालयात निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर नवी संघटनात्मक बांधणीबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि वरिष्ठ नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. ही बैठक जवळपास तीन ते चार तास सुरू होती. दरम्यान, कुठल्या राजकीय चर्चेला उधाण आलंय मला माहिती नाही. मी आणि चंद्रकांत दादा भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक बैठकीला दिल्लीमध्ये आलो आहोत. आमचे संघटनमंत्री बीएल संतोष, शिवप्रकाश, सीटी रवी, मी आणि चंद्रकांत पाटील यांच्यात संघटनात्मकतेची पुढची वाटचाल आणि आढाव्या संदर्भात बैठक झाल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला आहेत. परतु संघटनात्मकेची बैठक पार पडल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. सकाळपासून तीन ते चार तास आम्ही त्याच बैठकीमध्ये होतो. संघटनात्मकतेची पुढची वाटचाल आणि आढाव्या संदर्भात ही बैठक होती. त्यामुळे त्या व्यतिरिक्त आमचा काहीही वेगळा अजेंडा नव्हता. असं देखील फडणवीस यांनी म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटील आणि अमित शहांची भेट

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यावर प्रसार माध्यमांनी प्रश्न विचारल्यानंतर फडणवीस यांनी म्हटलं की, चंद्रकांत पाटील यांनी दिल्लीला आल्यानंतर अमित शहांची भेट घेतली. कारण ते आमचे नेते आहेत. तसेच दिल्लीला आल्यावर आम्ही त्यांची भेट घेतोच. त्यामुळे कुठलाही संघटनात्मक बदलाव होणार नाहीये. असं फडणवीस म्हणाले. त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आगामी काळात भाजपाचं सरकार येणार असल्याची भविष्यवाणी केली होती. परंतु फडणवीस यांना प्रश्न विचारला असता, मी त्यांचं वक्तव्य किंवा भविष्यवाणी ऐकलेली नाहीये. अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिलीय.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बिनविरोध…

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. परंतु नागपूरमधून अर्ज अद्यापही मागे घेतलेला नाहीये. त्यावर देवेंद्र फडणवीस असे म्हणाले की, काँग्रेसला अशी अपेक्षा आहे की, नागपूरमध्ये ते काही चमत्कार घडवू शकतील. परंतु कुठल्याही प्रकारचा चमत्कार घडणार नाहीये. चंद्रशेखर बावनकुळे हे चांगल्या फरकाने नागपूरमधून निवडून येतील. अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे.