घरमहाराष्ट्रपुण्यातील भाजपचे १९ नगरसेवक पक्षाला रामराम ठोकणार?

पुण्यातील भाजपचे १९ नगरसेवक पक्षाला रामराम ठोकणार?

Subscribe

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप खासदार गिरीश बापट यांनी वृत्ताचं खंडन केलं आहे.

पुणे शहरातील भाजपचे १९ नगरसेवक पक्षाला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. पुणे महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपला चांगलं यश मिळालं होतं. ९० हून अधिक नगरसेवक निवडून आले होते. दरम्यान, महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेतून भाजपमध्ये इनकमिंग झाली होती. आता हेच नेते पुन्हा एकदा भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत, अशी चर्चा सुरु आहे. मात्र, या चर्चेत तथ्य नसल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे खासदार गिरीष बापट यांनी म्हटलं आहे.

भाजप नगरसेवक नाराज असल्याच्या चर्चा केवळ माध्यमांमध्ये आहेत. पुड्या सोडल्या जातात. चुकीच्या बातम्या पसरवल्या जातात. कोणीही भाजप सोडून जात नाही आहे. उलट पुढील काही दिवसांत आमच्याकडे काही लोक येणार आहेत, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तर दुसरीकडे गिरीश बापट यांनी देखील नगरसेवक सोडून जाणार असल्याचं वृत्त चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. भाजपचा एकही नगरसेवक पक्ष सोडणार नाही, असा दावा गिरीश बापट यांनी केला. इतकंच नाही तर भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनीही या चर्चेचं खंडण केलं आहे. “नगरसेवक भाजपमध्ये नाराज असल्याच्या वृत्तात तथ्य नाही. आमचा एकही नगरसेवक कुठेही जाणार नाही. कुणीतरी मुद्दामहून ही बातमी पेरली आहे. ज्यामध्ये काहीही तथ्य नाही,” असं जगदीश मुळीक म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – निवडणूक संपली आता वसुली सुरु केली; फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -