‘कसबा हे भाजपाचे आहे, काँग्रेसचा उमेदवार निवडून आलाच तर…’, फडणवीसांचा हल्लाबोल

कसबा पेठ पोटनिवडणूक अवघ्या तीन दिवसांवर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महत्वाचे नेते कसब्यामध्ये प्रचार करत आहेत. नुकताच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार केला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यासह विरोधकांवर निशाणा साधला.

कसबा पेठ पोटनिवडणूक अवघ्या तीन दिवसांवर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महत्वाचे नेते कसब्यामध्ये प्रचार करत आहेत. नुकताच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार केला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यासह विरोधकांवर निशाणा साधला. ‘कसबा हे भारतीय जनता पक्षाचे आहे’, असे म्हणत काँग्रेसचा उमेदवार निवडणून येणारच नाही, पण काँग्रेसचा उमेदवार निवडून आलाच तर, त्याला विचारा पुणेश्वर महादेवाबद्दल तुझी या ठिकाणी भूमिका काय आहे, असा सवाल विचारण्यास देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

“आज मुक्ताताई टिळक यांची आठवण सर्वांनाच आहे. पण शेवटी निवडणूक आल्यानंतर या निवडणुकीला सामोरे जाणे आपले कर्तव्य होते. कसबा हे भारतीय जनता पक्षाचे आहे. कसबा हा गिरीश बापट यांनी बांधलेला आहे. गिरीश बापट यांनी जीवनभर जनतेची सेवा केली असून, पक्षाचे काम केले. आजारी असूनही त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेत विजयासाठी आव्हान केले. या निवडणुकीत अनेक गोष्टी सांगण्यात आल्या. कधी सांगितले ब्राह्मण समाज नाराज आहे. कधी सांगितलं हा समाज नाराज आहे. त्यानंतर सांगितले असं आणि तसं सांगितले. हा कसबा हिंदूत्ववादी कसबा आहे. हे छत्रपती शिवरायांचे पुणे आहे. त्यामुळे कोणी कितीही गैरसमज तयार करण्याचा प्रयत्न केला तरी, गैरसमज तयार होणार नाहीत”, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

“भाजपा आणि काँग्रेस लढाई नसल्याचे सांगून ही तर रासने आणि धनगेकर यांच्यातील लढाई असल्याचे बोलत आहेत. काल शरद पवार यांच्या बैठकीत त्यांच्याच पक्षातील एक नेते जातीवादी टिपणी करतात. मोदी आणि आरएसएस यांना हरवण्यासाठी देशभरातून आम्ही मुसलमान आणू. मेलेला मुसलमानही मतदान करायला येईल, असे सांगतात. हे सांगितलं जाते तेव्हा समजून जा की, ही लढाई धनगेकर आणि रासने यांच्यातील राहिलेली नाही. ही लढाई आता राष्ट्रीय विचारांचे लोक आणि काश्मीरला विरोध असलेल्या लोकांमध्ये लढाई आहे”, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

“काँग्रेसचा उमेदवार निवडणून येणारच नाही, पण काँग्रेसचा उमेदवार निवडून आलाच तर, त्याला विचारा पुणेश्वर महादेवाबद्दल तुझी या ठिकाणी भूमिका काय आहे, असा सवाल विचारण्यास देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. ही निवडणूक जरी एका मतदारसंघाची असली तरी, आताही लढाई वैचारिक झाली आहे. एकप्रकारे याठिकाणी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून, लांघूलचालन करून आणि आम्ही एकामताने निवडून येऊ असा त्यांना विश्वास आहे. पण मी त्यांना सांगिन की, आम्हाला १८ पघड जातीचे लोक हे भाजपाच्या बाजूने आहेत. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार सांगणारे आहोत. आपण संवेधनशील आहोत”, असेही फडणवीसांनी म्हटले.


हेही वाचा – राऊतांची महाराष्ट्राला गरज, त्यांना मानसिक आजार होतोय का?, आरोपांवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया