घरदेश-विदेशManipur Violence : विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची उपमुख्यमंत्र्यांची विनंती

Manipur Violence : विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची उपमुख्यमंत्र्यांची विनंती

Subscribe

मणिपूरमध्ये तणावाची परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत विद्यार्थ्यांना एका सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची विनंती देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. 

मुंबई | इशान्येकडील मणिपूर (Manipur Violence) राज्यात गेल्या काही दिवसांपासून हिंसाचार उफाळून आला आहे. मणिपूर हिंसाचारामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी एनआयटी  (Student NIT) शिकाण्यासाठी गेले आहेत. सध्याची मणिपूरची स्थिती पाहाता महाराष्ट्र सरकारने विद्यार्थ्यांना तातडीने परत आणण्यासाठी पाऊले उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विद्यार्थ्यांशी फोनवरून संवाद साधला असून विद्यार्थ्यांना मदतीचे आश्वासन दिले आहे. देवेंद्र फडणवीसांनी मणिपूर सरकारशी देखील चर्चा केली आहे. आणि मणिपूर पोलीस महासंचालकांशी देखील देवेंद्र फडणवीसांनी संपर्क केला. यानंतर मणिपूरमध्ये तणावाची परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत विद्यार्थ्यांना एका सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची विनंती देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.

मणिपूरमध्ये न्यायालयाच्या निर्णयानंतर हा हिंसाचार उसळला आहे. या उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत ५४ जणांचा मूत्य झाल्याची माहिती मिळाली आहे. मणिपूरमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी १० हजार जवानांना तैनात करण्यात आले आहे. मणिपूरमध्ये आदिवासी आणि बिगर आदिवासी समाजाताली झालेल्या वादामधूनच हा हिंसाचार सुरू आहे.  राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये ऑल ट्रायबल स्टूडंट यूनियन मणिपूर (ATSUM) या एका ‘आदिवासी एकता मार्च’ दरम्यान या हिंसाचार झाला आहे.

- Advertisement -

विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदतीची मुख्यमंत्र्यांची ग्वाही 

मणिपूरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचामुळे तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दूरध्वनीवरुन संपर्क साधला आणि त्यांना दिलासा देऊन सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली. दरम्यान, या अडकलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली असून लवकरच हे विमान अडकलेल्या २२ विद्यार्थ्यांना घेऊन महाराष्ट्रात दाखल होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

- Advertisement -

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -