४० हजार नाही, चार लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचा; फडणवीसांकडून अमीर खानला आवाहन

Devendra Fadnavis in Pani Foundation Program | कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आणि महाराष्ट्र शासनाने राबवलेल्या योजनांची माहिती दिली.

devendra fadnavis farmer cup

Devendra Fadnavis in Pani Foundation Program | पुणे – पाणी फाऊंडेशनच्या ‘सत्यमेव जयते फार्मर कप २०२२ बक्षिस वितरण सोहळा’ पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आणि महाराष्ट्र शासनाने राबवलेल्या योजनांची माहिती दिली. तसंच, यावेळी त्यांनी अभिनेता आणि पाणी फाऊंडेशनचे संस्थापक अमीर खान (Amir Khan) यांना आवाहन केलं आहे. पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी ४० हजार शेतकऱ्यांना समृद्ध केलं आहे. परंतु, ४० हजार हा आकडा लहान आहे. त्यामुळे आता ४० हजार नाही, चार लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचा, असं आवाहन फडणवीसांनी यावेळी केलं.

देवेंद्र फडणवीस अमीर खानला म्हणाले की, शेतकऱ्यांना तुम्ही हनुमान उडी मारायला सांगितली. पण आम्ही तुम्हाला दरवर्षी सांगतोय की तुम्हालाही हनुमान उडी घ्यावी लागेल. तुम्ही सुरुवातीला काही गावं घेतली होती. पण आम्ही तुमच्या न देखतच काही तालुके घोषित करून टाकले. ४० हजार शेतकऱ्यांनी काहीही होणार नाही. चार लाखांवर जावं लागेल. याची स्केल वाढवण्याकरता जी शासनाची मदत लागेल, ती आम्ही देऊच. अधिकाऱ्यांसोबत तुमची मैत्री आहे. त्यांना आम्ही सांगण्याचीही आवश्यकता नाही. या प्रकल्पाची स्केल वाढवा. आम्ही पूर्ण ताकदीनं उभं राहू, असं आश्वासनही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिलं.

देशावर अल् नोनीचं संकट घोंघावत आहे. यामुळे पाऊस कमी पडू शकतो. २०१७ सारखा दुष्काळ पुन्हा पडू नये याकरता आम्ही विठ्ठलाचरणी प्रार्थना करतो. पण समजा अतिवृष्टी किंवा अवर्षण आलंच तरी शेतकरी थांबला नाही पाहिजे, याकरता आम्ही प्रयत्न करत आहोत. यासाठी जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. ज्या गावात जलसंधारणाचं काम पूर्ण झालंय त्यांनी योग्य स्ट्रक्चर करायला सुरुवात केली पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तुमच्या कथा ऐकून स्फुरण चढेल

आज जो शेतकरी दुर्दैवाने निराशेत असेल त्याला तुमची कथा सांगितली. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची कथा सांगितलं की स्फुरण चढतं, त्याचप्रमाणे तुमची कथा सांगितल्यास एखाद्या कष्टकरी, दुःखी शेतकऱ्याला स्फुरण चढेल आणि आपल्या पायावर पुन्हा उभे राहिल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.