घरताज्या घडामोडीदेवेंद्र फडणवीस हे गुंडाची बाजू घेत आहेत; संजय राऊतांचा घणाघात

देवेंद्र फडणवीस हे गुंडाची बाजू घेत आहेत; संजय राऊतांचा घणाघात

Subscribe

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस हे बेजबाबदारपणे वागत आहेत. ते गुंडाची बाजू घेत आहेत, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस हे बेजबाबदारपणे वागत आहेत. ते गुंडाची बाजू घेत आहेत, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे. (Devendra Fadnavis is siding with the gangster Sanjay Raut allegations)

“मला सनसनाटी निर्माण करण्याची गरज नाही. देवेंद्र फडवणीस यांच्या आधीपासून मी राजकारणात आहे. सामना सारख्या वृत्त पत्राचा 35 वर्षांपासून संपादक आहे,आम्ही लाईम लाईट मध्येच असतो. आमची बाळासाहेब ठाकरे स्कूल आहे,रामभाऊ माळगी प्रतिष्ठान नाही. मी गृहमंत्री म्हनून त्यांना पत्र लिहिल त्यांनी बेजबाबदार उत्तर दिले. इतके बेफिकीर गृहमंत्री देवेंद्र फडवणीस मला दिसत आहे. त्यांची नेमकी काय सटकली आहे मला माहित नाही. ते इतरांच्या बुद्धीची माप काढतात त्यांच्या बुद्धीच माप जर काढायला लागलो तर गडबड होईल”, असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

“या महाराष्ट्रतील खासदार त्यांना पत्र लिहितो आहे. त्याच्यावर त्यांनी गांभीर्य न राखता विधान केले आहे ते राज्याच्या गृहामंत्रीला शोभत नाही. ते एका गुंडाची बाजू घेत आहे. ज्या एका प्लॉट विषयी मी त्यांना माहिती दिली त्यावर त्यांनी मौन राखायला हवं होतं, किंवा मौन राखायला हवं होतं. गृहमंत्री पदाची जबाबदारी न राखता ते जे बोलत आहे. ते गोंधळलेले दिसत आहे. त्या गोंधळाचा महाराष्ट्राला त्रास होत आहे”, असे संजय राऊत म्हणाले.

“अशोक चव्हाण यांनी खुलासा केला त्यांना मारण्याचा प्लान आहे. प्रदन्या सातव यांच्यावर हल्ला झाला. जितेंद्र आव्हाड यांना मारण्याची सुपारी दिली गेली आहे. हे सर्व फडणवीस गृहमंत्री असताना होत आहे. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री रोज असताना राज्यात खून, दरोडे, बलात्कार होत आहे. लोक प्रतिनिधी देखील सुरक्षित नाही. मला सुरक्षेची गरज नाही, उलट त्यांना सुरक्षा लागली तर मी त्यांना देईल. मी एकटाच फिरतो, मी एकटाच लढतो आणि नडतो”, असेही संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

“तुमचं गृहमंत्री पद राजकीय विरोधकांना त्रास देण्यासाठी नसावं. राज्याच्या सुरक्षेसाठी असावं. महाराष्ट्रात सध्या जे चित्र आहे, ज्याप्रकारे राज्य आलं आहे त्यांना चालवणे अवघड. हा निकाल विकत घेतला आहे. 2 हजर कोटी रुवयांचे पॅकेज यावर खर्च झाले आहे. सर्वोच न्यायालयात काय होईल सांगता येत नाही. हे सरकार मुंग्याच्या वाळवीवर उभं आहे. 2024 साली ही सगकी चेष्टा आणि मस्करी बाहेर पडेल. गृहमंत्री म्हनून तुम्ही गुवतात पाळल्या पाहिजे माझ्याकडे जी महिती आली ती आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचवतो आहे. तपास करा असे मी म्हणतो आहे. माहिती अशीच असते कोणी समोर येऊन सांगत नाही आम्ही तुमच्यावर हल्ला करणार आहे. सुरक्षेबाबत सरकारला कळलं पाहिजे. नोकरांना देखील सुरक्षा देण्यात आली आहे”, असेही संजय राऊत म्हणाले.


हेही वाचा – बाळासाहेबांच्या भूमिकेनुसारच शिवसेना आता युती करणार, उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -