घरमहाराष्ट्रनागपूरDevendra Fadnavis : सर्व्हे काहीही येऊ द्या, लोकांची मानसिकता मोदींसोबतच - फडणवीस

Devendra Fadnavis : सर्व्हे काहीही येऊ द्या, लोकांची मानसिकता मोदींसोबतच – फडणवीस

Subscribe

पंकजा मुंडेंबाबत वरिष्ठ चांगलाच निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटीवर दिली आहे.

नागपूर : सर्व्हे काहीही येऊ द्या, लोकांची मानसिकता ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाण्याची आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाइम्स नाऊ मॅट्रीझच्या सर्व्हेवर दिली आहे. टाइम्स नाऊ मॅट्रीझच्या सर्व्हेमध्ये महाराष्ट्रात भाजपाला 39 तर महाविकास आघाडीला 9 जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सर्वे काहीही येऊ द्या, मग तो सर्वे चांगला असो की वाईट, लोकांची मानसिकताही  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाण्याची आहे. लोकांनी ठरविले आहे की, मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवायचे. त्यामुळे मोदीजी आणि त्यांना समर्थन करतात, अशा प्रत्येकाला जनता निवडून देणार आहे, असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे. लोकसभेत भाजपाला महाराष्ट्रात किती जागा येईल? यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मागच्या वेळी जेवढ्या जागा आल्या, त्यापेक्षा कमी येणार नाही. पण आल्या तर जास्त जागा येतील.”

- Advertisement -

हेही वाचा – Bhaskar Jadhav : …काँग्रेस आपला वापर करत नाही ना? भास्कर जाधवांचा सवाल

पंकजा मुंडेंबाबत वरिष्ठ चांगलाच निर्णय घेतील

पंकजा मुंडेंच्या भेटीवर फडणवीस म्हणाले, “पंकजा मुंडे या आमच्या पक्षाच्या नेत्या आहेत. त्यामुळे मी आणि पंकजा मुंडे भेटलो, तर त्या काही नवल नाही. या भेटीदरम्यान राज्यसभेबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्ही एकूण राजकीय चर्चा केली आहे.” पंकजा मुंडे राज्यसभेवर केल्यानंतर फायदा होईल का? या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राज्यसभेत कोण जाईल किंवा जाणार नाही. पंकजा मुंडेबाबत आमचे वरिष्ठ निर्णय घेतील. पंकजा मुंडे या राष्ट्रीय मंत्री आहेत. त्यामुळे त्यांना राज्यसभेत किंवा लोकसभेत पाठवायचे. पंकजा मुंडेंना कोणते पद द्याचे,  याबाबतचा निर्णय केंद्रीय पार्टी घेईल.”

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -