घरCORONA UPDATECorona Fighters : देवेंद्र फडणवीस यांचे डॉक्टर्स, परिचारिकांच्या वेतनप्रश्नी मुख्यमंत्र्यांना पत्र

Corona Fighters : देवेंद्र फडणवीस यांचे डॉक्टर्स, परिचारिकांच्या वेतनप्रश्नी मुख्यमंत्र्यांना पत्र

Subscribe

विधानसभा विरोधी पक्षनेते (devendra fadnavis) देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनाच्या संकटात निकराने लढणाऱ्या डॉक्टर्स आणि परिचारिकांच्या वेतनासंबंधी पुन्हा एकदा (CM Uddhav thackeray) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. (Covid 19) कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण हे महाराष्ट्रात आढळून आले आहेत. या संकटकाळात देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य सेवेसंबंधी अनेकदा प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी नाशिक, ठाणे शहराचा दौरा केला असून काही सेंटर्सलाही भेटी दिल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून अहोरात्र झटणाऱ्या कोरोना योद्धा डॉक्टर्स आणि परिचारिकांना यांच्या वेतन प्रश्नाकडे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. त्यांनी ट्विट करून त्याची माहिती दिली आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस –

कोरोनाच्या कालखंडात स्वतःच्या जिवाची पर्वा न करता आणि सामाजिक भान राखत सेवा देत असणाऱ्या डॉक्टर्स, परिचारिका यांना साधे वेतनसुद्धा मिळू नये, ही स्थिती अतिशय गंभीर आहे. मुंबई महापालिकेने ज्या निवासी डॉक्टरांच्या सेवा घेतल्या आहेत, त्यांचे जून महिन्याचे विद्यावेतन अद्यापही मिळालेले नाही. गेल्या ४ महिन्यांपासून ते कोविड रूग्णालयात सेवा देत आहेत. विद्यावेतन नाही, कोविड रूग्णालयात काम केल्याबद्दल प्रोत्साहनपर भत्ता मागूनही दिला जात नाही आणि दुसरीकडे आपत्ती व्यवस्थापनाच्या नावाखील १ हजार रूपये कपात त्यांच्या विद्यावेतनातून करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

Police Recruitment: १२,५३८ पोलीस पदांची भरती; ५ महिन्यांत प्रक्रिया पूर्ण करणार!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -