Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी अशोकरावांची मजल २जी, ३जी आणि सोनियाजींपर्यंतच; फडणवीसांचा चव्हाणांवर हल्लाबोल

अशोकरावांची मजल २जी, ३जी आणि सोनियाजींपर्यंतच; फडणवीसांचा चव्हाणांवर हल्लाबोल

Subscribe

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नांदेडमध्ये आम्ही सभा ठेवली. तेव्हा अशोक चव्हाण म्हणाले की, त्यांना निवडून येण्याची खात्री नाही त्यामुळे ते सभा घेत आहेत. परंतु अशोकराव असं काही नसून आमच्याकडे ९ वर्षात केलेलं काम सांगण्यासारखं आहे. त्यामुळे आम्ही सभा घेत आहोत. त्यामुळे इतके लोकं याठिकाणी उपस्थित आहेत. अशोक चव्हाण तुमची मजल फक्त २जी, ३जी आणि सोनियाजी यांच्या पलीकडे गेलीच नाही. तुमच्याकडे सांगण्यासारखं काही उरलंच नाही, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्यावर हल्लाबोल केला.

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज हाच पॅटर्न

- Advertisement -

देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची नांदेडमध्ये सभा होत असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली. जनतेचा महासागर याठिकाणी पाहायला मिळत आहे. काँग्रेस पक्षाला अधूनमधून विजय मिळतो आणि तो त्यांच्या इतक्या डोक्यात जातो की, आता काँग्रेसचा कुठलाही नेता महाराष्ट्रात उठला, तर म्हणतो की, आम्ही महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न आणू. कर्नाटक म्हटलं की त्यांना राग येत होता. ते म्हणताहेत कर्नाटक पॅटर्न आणू पण मी त्यांना सांगतो की, महाराष्ट्रात एकच पॅटर्न चालतो आणि तो आहे छत्रपती शिवाजी पॅटर्न. येथे कुठलाही कर्नाटक पॅटर्न चालू शकत नाही. छत्रपती शिवरायांचा पॅटर्न जर कुणी संपूर्ण देशात आणला असेल तर तो नरेंद्र मोदींनी आणलाय. मोदी पॅटर्न आपल्याला २०१४ आणि २०१९ मध्ये विजय मिळवून दिला. पण २०२४ मध्ये महाविजयाची तयारी आपण याठिकाणाहून सुरू केली आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

…म्हणून पवार उघडे पडतात

निवडणूक जवळ आल्या की, पवारांच्या स्टेटमेंट चालू होतात. २०१४ च्या निवडणुकीपूर्वी शरद पवार तेच बोलले. २०१९ ची निवडणूक, विधानसभा निवडणूक यामध्ये ते सारखेच स्टेटमेंट करतात. तसेच निवडणुका जवळ आल्या की, मोदींची लाट नाहीये, असं पवार सांगतात. असं सगळं सांगून पुन्हा हेच उघडे पडतात आणि मोदीच याठिकाणी निवडून येतात, अशी खोचक टीका फडणवीसांनी पवारांवर केली आहे.

देश मोदींच्या मागे होता आणि उद्याही राहिल

- Advertisement -

२०१९पूर्वी शरद पवारांनी सांगितलं की, संपूर्ण देशभरात विरोधकांची हवा आहे. मोदींची हवा संपलेली आहे. सगळे विरोधक आपल्याला हातात हात घालून आपल्याला पाहायला मिळाले. हात वर करून उभे राहिले. पण जेवढे विरोधक यांनी एकत्रित केले होते. तेवढ्या जागा देखील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या देशात मिळून नाही आल्या. देशात मिळून आल्या नाहीत, जेवढे नेते यांच्या मंचावर होते ही, अवस्था आज आपल्याला पाहायला मिळते. आता पुन्हा निवडणुका जवळ आल्या आहेत. देशामधली हवा बदलत आहे, असं पवारांचं स्टेटमेंट आहे. पण देशातील हवा बदलतच नाहीये. हा देश कालही मोदींच्या मागे होता. आजही आहे आणि उद्याही मोदींच्याच मागे राहील. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशची आमची स्पर्धा आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.


हेही वाचा : Sharad Pawar : अजित पवारांनी सुप्रिया सुळेंचं नाव सुचवलं, नाराजीचा प्रश्नच नाही – शरद


 

- Advertisment -